
Hrithik Roshan: हृतिक करणार गर्लफ्रेंड सबाशी लग्न? जाणून घ्या राकेश रोशन काय म्हणाले
बी-टाऊनचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याला अनेकदा इव्हेंटमध्ये एकत्र पाहिले जाते. हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.
अशा स्थितीत आता हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी या अफवांवर मौन सोडले असून त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
स्पॉटबॉयशी बोलताना राकेश रोशन म्हणाले, 'मला याबाबत अद्याप माहिती नाही. त्या दोघांच्या नात्याला वेळ द्या. मैत्री झाली की लग्नाच्या गोष्टी सुरू. हृतिक प्रेमात असला तरी लहान नाही, त्याला मुले आहेत आणि त्याच्यावर मुलांची जबाबदारी आहे.'
हृतिक आणि सबा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी त्यांचे नाते अधिकृत केले. ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसाठी गोंडस पोस्ट शेअर करतात. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, 'सुपर 30' अभिनेता आणि सबा यांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती.
सबासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी हृतिकने सुझान खानशी लग्न केले होते. 2000 मध्ये त्यांनी लग्न केले पण जवळपास 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले. सुझान सध्या अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक रोशन दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय यांच्यासोबत 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. हृतिक शेवटचा सैफ अली खानसोबत 'विक्रम वेधा'मध्ये दिसला होता.