14 लाखांचा चेक हातात आला, राखी बिग बॉसच्या फायनलमध्ये

rakhi sawant became bigg boss 14 finalist after accepting show makers condition
rakhi sawant became bigg boss 14 finalist after accepting show makers condition

मुंबई - बिग बॉसचा १४ वा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. त्यात सहभागी झालेले स्पर्धक हे आपले स्थान वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशावेळी त्यातील प्रत्येकाला अंतिम यादीत स्थान मिळवायचे आहे. अशावेळी राखी सावंत कशाला मागे राहील, तिनंही बिग बॉसच्या सर्व अटी मानून फायनलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत होती. तिची आणि अभिनव शुक्लाच्या प्रेमाची चर्चा सा-या देशाला माहिती झाली.

सहभागी स्पर्धकांना सांगण्यात आले होते की, ते १४ लाख रुपयांचा चेक घेऊन सरळ शेवटच्या फेरीत सहभागी होऊ शकतात. मात्र त्यावेळी त्यांना अट अशी घालण्यात आली होती की जर ते जिंकले तर त्यांनी जिंकलेल्या पैशांतून १४ लाख परत करायचे. त्या अटीला राखी सावंत, अली गोनी आणि राहुल वैद्य यांना सामोरं जावं लागलं. त्यावेळी जो स्पर्धक त्या १४ लाख रुपयांचा चेक घेण्यास उत्सुक असता त्याचे शेवटच्या फेरीतील स्थान पक्के समजले गेले असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अशावेळी राखीनं संधीचा फायदा करुन घेतला आहे. आणि तिनं कसलाही विचार न करता सगळ्यात पहिल्यांदा चेक उचलला. आणि ती बिग बॉसच्या शेवटच्या फेरीत पोहचली आहे. आता तिची स्पर्धा अली गोनी, राहुल वैद्य आणि देवोलिना भट्टाचार्य यांच्याशी आहे. हे तिन्ही खेळाडू चांगली चुरस निर्माण करणारे आहेत. त्यांच्यातील मुकाबला पाहणे सर्वांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. याशिवाय कोण विजेता होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिग बॉसची सर्वात चर्चिली जाणा-या रुबीनाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे, ती शेवटच्या फेरीत आपले स्थान निर्माण करु शकली नाही. त्याचा फायदा निक्की तांबोळीला मिळाला. तिला फायनल पर्यत आणण्यात रुबीनाचा मोठा हात होता. रुबीनानं एक टास्क जिंकला होता. तुला फायनलमध्ये कुणाला पाहायला आवडेल असे ज्यावेळी रुबीनाला विचारण्यात आले तेव्हा तिनं निक्कीचं नाव घेतलं होतं. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com