राखी सावंतकडून चुकून 'खतरों के खिलाडी 11'च्या विजेत्याचं नाव जाहीर

बोलताना ओघाओघात राखीच्या तोंडून निघालं विजेत्याचं नाव, पाहा व्हिडीओ
Rakhi Sawant
Rakhi Sawant

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू असलेलं 'खतरों के खिलाडी ११' Khatron Ke Khiladi 11 या रिअॅलिटी शोचं शूटिंग नुकतंच संपलं आहे. त्यानंतर या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सर्व देशात परतले आहेत. हा शो लवकरच छोट्या पडद्यावर सुरू होणार आहे. मात्र शो सुरू होण्याआधीच 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने Rakhi Sawant चुकून विजेत्याचं नाव घोषित केलं. जिमला जात असताना पापाराझींनी राखीला प्रश्न विचारला असता, तिने बोलण्याच्या ओघात विजेत्याचं नाव सांगितलं. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Rakhi Sawant blurts out who won Khatron Ke Khiladi 11 Watch video)

"सर्वजण परत आले का? सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राहुल वैद्य, श्वेता तिवारी यांचं स्वागत. अजून कोण होतं?" असा प्रश्न तिने आधी पापाराझींना विचारला. त्यांना काही स्पर्धकांची नावं सांगितली, तेव्हा राखी पटकन म्हणाली, "अर्जुन बिजलानी. अर्जुन बिजलानी जिंकला ना? हो, तोच जिंकलाय." आता राखीच्या म्हणण्यानुसार खरंच अर्जुन जिंकलाय का, हे मात्र शो सुरू झाल्यावरच समजू शकेल.

Rakhi Sawant
Khatron Ke Khiladi 11: रोहित शेट्टीसह स्पर्धकांना मिळतंय तब्बल इतकं मानधन

मंगळवारी, या रिअॅलिटी शोचे स्पर्धक वरूण सूद, दिव्यांका त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, विशाल आदित्य सिंग, अनुष्का सेन, राहुल वैद्य हे मुंबईत परतले. त्याआधी निक्की तांबोळीसुद्धा परतली. भावाच्या निधनानंतर दोन दिवसांत निक्की या शोच्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली होती. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

राखी सावंत 'बिग बॉस १४'च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. मात्र अंतिम फेरीत तिला पैशांचा पर्याय दिला असता १४ लाख रुपये स्वीकारून ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. आईच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचं राखीने सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com