Rakhi Sawant: कबरीवर सोबत येणार का? पापाराझींना दिली ऑफर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant

Rakhi Sawant: कबरीवर सोबत येणार का? पापाराझींना दिली ऑफर...

ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आदिल खानसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. राखी सावंत ही तिच्या अंतरंगी ड्रामा मुळे आणि तिच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत असते. बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये राखी सावंतचा ड्रामा काय कमी नाही पाहिला.

हेही वाचा: Pathaan Movie Release: इंदूरमध्ये पठाणचे अनेक शो रद्द, थिएटरला आग लावण्याची धमकी तर प्रेक्षकांना पळवले..

आता परत ती तिचा नवीन प्रियकर आदिल खान दुर्रानी बरोबर लग्न केल्याचं नवीन ड्रामा सुरू केला होता. मग काय बुरखा घालून ड्रामा केला .पण आता राखी पापाराझीवर नाराज झाली आहे.

तिच्या आईची प्रकृती ठिक नसल्यानं त्यांनारुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यावर उपचार सुरु आहेत. आईला भेटण्यासाठी जातांनांही तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतं आहेत. ज्यामध्ये ती तिच्या आईच्या प्रकृतीबदद्ल आणि बऱ्याच गोष्टीबाबत बोलत असते.

हेही वाचा: Pathaan Movie Release: पठाण जोमात बॉयकॉट गँग कोमात! शाहरुखच्या एन्ट्रीन थिएटर झिंगाट..

मीडियासमोर राखी सावंतचे नखरे काही कमी नसतात हे तर माहिती आहे पण आता राखी मीडियावर चिडली आहे. झालं असं की राखी सावंत तिच्या मैत्रिणी बरोबर जात असते. मीडिया तिला फॉलो करते आहे तर राखी बोलते "मी जेव्हा मरेन , माझ्या कबरीवर पण याल तुम्ही, माझी परिस्थिती चांगली नाही आहे. माझ काहीही होऊ शकतं. काही खरं होईल अन् राखी रडत तिथून जाते.

हेही वाचा: Pathaan Movie Release: पठाण अन् भाईजान एकत्र! 'किसी का भाई किसी की जान'चा टिझर रिलीज

गेल्या काही दिवसांपासून राखीची परिस्थीती ठिक नाही. नुकतच राखी सावंतला मॉडेलचा शर्लिन चोप्राचे फोटो व्हायरल केल्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी अटक केली होती. तिने अटक होण्यापासून सुटका व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अपील केलं आहे. राखीला तुर्तास हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून मंगळवारपर्यंत राखीला कोणतीही अटक होणार नाही, असा आदेश हायकोर्टाने दिलाय.


टॅग्स :Rakhi Sawant