राखी सावंतने केले लग्न पण अजूनही लपवलं का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राखीने ‘हो, मी लग्न केले आहे. पण, मला माझ्या लग्नाबद्दल सांगताना भीती वाटत होती. मला माझ्या लग्नाचे गुपित ठेवायचे होते. लग्न हे दोन कुटूंबांसाठी असते, जगाला दाखवायला नसते’ असे तिने यावेळी सांगितले.  

राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने अमेरिकेतील एनआरआय व्यक्तिसोबत लग्न केले असून, ते सर्वांपासून लपवले होते. मुकताच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्नाचा निर्णय सर्वांपासून का लपावला याचा खुलासा केला आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राखीने ‘हो, मी लग्न केले आहे. पण, मला माझ्या लग्नाबद्दल सांगताना भीती वाटत होती. मला माझ्या लग्नाचे गुपित ठेवायचे होते. लग्न हे दोन कुटूंबांसाठी असते, जगाला दाखवायला नसते’ असे तिने यावेळी सांगितले.  

Image result for rakhi sawant

दरम्यान, तिने तिच्या पतीला मीडियापासून दूर रहायला आवडते असा खुलासादेखील केला आहे. ‘माझ्या नवऱ्याला मीडियासमोर येणे आवडत नाही,' असेही त्यांनी येवाळी सांगितले.

राखीने ‘माझा नवरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीमध्ये काम करतो. राखीच्या लव्ह स्टोरीची सुरुवात व्हॉट्सअॅपवरुन झाली. ‘सुरवातीला आमच्यात मैत्रीचे नाते होते. नंतर हळूहळू आम्ही एकमेकांशी बोलू लागलो आणि भेटू लागलो. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे समजलेच नाही. ही दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे’, असे वक्तव्य केले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर पुन्हा नव्या चर्चांना सुरवात झाली आहे. 

‘माझा नवरा युकेला राहतो. माझा व्हिसा अजून मिळायचा आहे म्हणून मी इथे थांबलीये. व्हिसा आल्यावर मीसुद्धा तिथेच जाईन’ असे राखी पुढे म्हणाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakhi Sawant confessed that she is getting married with NIR