
अभिनेत्री राखी सावंत हिने देखील कोरोना व्हायरसवर चिंता व्यक्त केली होती..तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगानं वाढत चालली आहे. आज राज्यात अजून ३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वरून ५२ वर पोहोचली आहे. या व्हायरसपासून सुरक्षितता म्हणून सोशल मिडीयावर अनेक उपाय आणि सल्ले दिले जात जात आहेत तर दुसरीकडे या कोरोना व्हायरसवर
मनोरंजन म्हणून अनेक जोक्स देखील व्हायरल होत आहेत..
मोठी बातमी: 31 मार्चपर्यंत 4 मोठी शहरं राहणार बंद-मुख्यमंत्री
या साखळीमध्ये आता बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी होताना पाहायला मिळत आहेत..गेल्या काही दिवसांपासून यावर अनेक सेलिब्रिटी चांगल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत..नुकतीच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांनी यावर उत्तम कविता देखील केली होती..
तर दुसरीकडे अभिनेत्री राखी सावंत हिने देखील कोरोना व्हायरसवर चिंता व्यक्त केली होती..तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता..या व्हिडिओत कोविड-19 का पसरत आहे ? आणि त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात ? हे तिने तिच्या पद्धतीने सांगितलं आहे...तिने तीचा हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकण्याची विनंती केली होती..
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राखी सांगतेय, ''मी प्रार्थना करतेय की माझं ऐका. मित्रांनो कोरोना व्हायरस पसरत चालला आहे..अनेकजण हात, पाय, तोंड, नाक आणि काय काय स्वच्छ करायला सांगत आहेत मात्र सगळं स्वच्छ कराल पण तुमच्या अंतर्मनाचं काय ? ते कसं स्वच्छ करणार ? आपण पापं केली आहेत..सगळ्या जगाने पापं करुन ठेवली आहेत..तेव्हा आता या पापी लोकांनी प्रायश्चित्त म्हणून देवाला शरण जावं आणि आपल्या कर्माची माफी मागावी..
'कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलंय..अनेक मोठे कार्यक्रम रद्द केले आहेत..सिनेमा, मालिकांची शूटींग बंद करुन सिनेमांच्या प्रदर्शनावर देखील बंदी आणली आहे..अनेक सेलिब्रिटींनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत..यासोबंतच अनेक राज्यात सरकारने शाळा, चित्रपटगृह आणि दुकानं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत...
rakhi sawant on corona said this is your karma