
Rakhi Sawant ला कोर्टात आदिलकडून धमकी..म्हणाला,'बाहेर आल्यावर..'
Rakhi Sawant & Adil Khan Durrani Case: अभिनेत्री राखी सावंतच्या तक्रारीनंतर तिचा पती आदिल खानच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राखीनं त्याच्यावर कौटुंबिक अत्याचार आणि तिच्याशी पैशाच्या व्यवहाराबाबत फसवणूक केल्याचे गंभीर आरोप लावले आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी या प्रकरणासंदर्भात सुनावणी होती आणि अंधेरी कोर्टानं तेव्हा आदिलला चार दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली होती. चार दिवसांनंतर २० फेब्रुवारीला आज पुन्हा एकदा कोर्टात आदिलला हजर केलं गेलं .
या दरम्यान कोर्टात आपल्या वकीलासोबत राखी सावंत देखील हजर होती. तिचे वकील अशोक सरावगी यांनी मीडियाशी बातचीत करताना सांगितलं की,''चार दिवसांच्या पोलिस कोठडीत काही गोष्टींविषयी चौकशी केली गेली. कोर्टाला वाटलं की आता चौकशीसाठी पोलिस कोठडी आवश्यक नाही. त्यामुळे आता पुन्हा आदिलला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे''.(Rakhi Sawant crying video adil khan threatened in the court, he is in judicial custody now)
एका ईराणी महिलेनं आदिलवर लग्नाचं खोटं वचन देत रेप केल्याचा आरोप केला होता. तसा एफआयआर देखील दाखल केला गेला आहे. आता या प्रकरणातही आदिल खानच्या अडचणी वाढू शकतात.
आदिलवर कलम ३७६ अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. तर राखीच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार पोलिसांजवळ ट्रान्सफर वॉरंट आहे आणि या प्रकरणाची सुनावणी आता २४ फेब्रुवारी रोजी म्हैसूर कोर्टात होणार आहे. त्यामुळे आदिलला म्हैसूर कोर्टात नेलं जाईल अशी शक्यता आहे.
तसंच ई टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार,राखीच्या वकील फाल्गुनी ब्रह्मभट्टनं देखील कन्फर्म केलं आहे की,राखीच्या केस प्रकरणात तिचा पती आदिलला न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे. तर ईराणी महिलेच्या केस प्रकरणात कोर्टानं म्हैसूर पोलिसांना आदिलची कस्टडी मंजूर केली आहे. आता हे प्रकरण कोणतं वळण घेतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
यादरम्यान आता एक व्हिडीओ व्हायर होत आहे ज्यात राखी आदिलनं आज कोर्टात तिला धमकी दिल्याचं मीडियाला सांगत आहे.
राखी सावंतनं पापाराझीशी बातचीत करताना सांगितलं की,''आज मी आदिलला कोर्टात पाहिलं तो मला अॅटिट्युड दाखवत होता. जेलमध्ये मोठ्या डॉन लोकांना भेटलोय...मी बाहेर आलो की विचार कर तुझं काय होईल''. राखीनं सांगितलं की आदिल तिला कोर्टात धमकी देत होता.