
Rakhi Sawant: आदिल गेला आता नवीन हबीबी भेटला.. राखी सावंतला मिळाला तिचा दुसरा राजकुमार, त्याचं नाव सांगत म्हणाली...
बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी राखीच्या आईचे निधन झाले, तर त्यानंतर लगेच तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या. सध्या तिचा पती आदिल तुरुंगात आहे. अशातच राखीचा एक लेटेस्ट व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
राखी नेहमीच तिच्या अतरंगी वागण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. राखीच्या अतरंगीपणामुळे अनेकदा तिला प्रचंड ट्रोलही केलं जातं. राखीला आता तिचा शेहजादा भेटला असल्याचं तिने स्वतः सांगितलं. दुबईमध्ये राखीचा हा शहजादा तिला भेटला. तसेच त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
राखीच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती एका व्यक्तीचा हात पकडून चालताना दिसत आहे. राखी म्हणते, “या हबीबी… राखी सावंतला मिळाला तिचा हबीबी. हे अरबीजी आहेत. दुबईत आले आणि मला मिळाला माझा शहजादा." तसेच राखी त्यांना या व्हिडीओमध्ये अरबी भाषेत तिचं कौतुक देखील करायला सांगते. राखीने या व्हिडीओमध्ये त्यांना हात पकडून गोलही फिरवलं आणि शेवटी राखी त्यांचा हात धरून त्यांच्याबरोबर गेली.
राखीचा हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एकाने लिहिले, "तो काय लहान मुलगा नाही की तू त्याला गोल गोल फिरवतेस." दुसऱ्याने लिहिले, "राखीचा होणारा पती." तसेच आणखी एक म्हणाला, राखीला अजून किती हबीबी हवेत!”. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.