Rakhi Sawant: तो मला मारायला आला ', नवऱ्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर राखीची प्रतिक्रिया.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant

Rakhi Sawant: तो मला मारायला आला ', नवऱ्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर राखीची प्रतिक्रिया..

राखी सावंत ही सध्या चर्चेत आहे. राखीच्या तक्रारीनंतर तिचा नवरा आदिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदिल राखीच्या घरी तिला भेटायला गेला होता आणि त्यानंतर पोलीसही तिथे पोहोचले आणि त्यांनी आदिलला ताब्यात घेतले.

राखीने अलीकडेच आदिलवर मारहाणीचा आरोप केला होता. या संदर्भात राखीने 5 फेब्रुवारीला ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. आदिलला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे.

आदिलच्या अटकेनंतर तिने सांगितले की, तिने फसवणुकीच्या प्रकरणी तिच्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर आदिलला अटक करण्यात आली आहे.

तिने मिडियाला सांगितले की , 'हे फक्त मीडिया ड्रामा किंवा ड्रामा नाही. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्याने मला मारहाण करून माझे पैसे लुटले आहेत. कुराण वर हात ठेवूनही त्याने माझ्यासोबत फसवणूक केली आहे. मी मीडियाला विनंती करते की सत्य समोर आणण्यासाठी मदत करावी.

त्याचबरोबर तिला पापाराझींनीही स्पॉट केलं तेव्हा ती म्हणाली की , तो सकाळी मला मारायला घरी आला होता. त्यावेळी मी पोलिसांना फोन करुन त्याला अटक करण्यास सांगितलं. आता मला भेटण्यासाठी बोलवतं होता. आता मी FIRही केली आहे. आता त्याला माफ करणार नाही.

राखी सावंतने काही दिवसांपूर्वी मीडियासमोर आदिलच्या विवाहबाह्य संबंधाबाबत खुलासा केला होता. आदिल तिची फसवणूक करत असून तरीही तो सुधारला नाही तर सर्वांसमोर त्याचा पर्दाफाश करेल, असे राखीने म्हटली होती. आता पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणा संदर्भात आदिलच्या बाजूने अदयाप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.