Rakhi Sawant Song Video: नौटंकी राखीच नवं गाणं की आदिल वर निशाणा.. व्हिडिओ बघाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rakhi sawant, rakhi sawant news, rakhi sawant song video

Rakhi Sawant Song Video: नौटंकी राखीच नवं गाणं की आदिल वर निशाणा.. व्हिडिओ बघाच..

Rakhi Sawant News: ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. राखी सावंतचं नवीन गाणं सोशल मीडियावर नुकतंच रिलीज झालंय. हे गाणं पाहून राखीने जणू काही तिच्या आयुष्याचा जीवनपट तीन मिनिटाच्या गाण्यात मांडला असल्याचं दिसतंय.

मधल्या काळात राखीच्या आयुष्यात अनेक वादळं घडली. राखीचा बॉयफ्रेंड आदिल सोबत लग्न, घटस्फोट, राखीच्या आईचं निधन अशा अनेक गोष्टी घडल्या. या सर्व गोष्टी राखीने या गाण्याच्या माध्यमातून मांडल्या आहेत.

(rakhi sawant new song video jhootha out now on you tube)

झूठा असं या गाण्याचं नाव असून या गाण्यात राखीच्या आयुष्याचा घटनाक्रम घडलाय. राखी सावंत सुप्रसिद्ध हिरोईन असते. नंतर तिच्या आयुष्यात एक बॉयफ्रेंड येतो. हा बॉयफ्रेंड तिला लग्नाची मागणी घालतो. दोघांचं लग्न होतं.

मग पुढे हाच बॉयफ्रेंड वेगळ्या मुलीसोबत वेळ घालवतो. राखीला हे कळतं. ती त्याला जाब विचारते. मग पुढे बॉयफ्रेंड तिला मारहाण करतो. अशातच राखीच्या आईचं निधन होतं. आईच्या निधनाचा ती आक्रोश करते. असा घटनाक्रम या गाण्यात दिसतो.

राखीने हे गाणं रिलीज करून तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुरानी वर निशाणा साधल्याचं दिसतंय. राखीने आदिल विरोधात FIR दाखल केल्याने तो सध्या तुरुंगाची हवा खात आहे. राखी सावंत हे नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांचा थरकाप उडतो.

बॉलीवुडमध्ये फारशी सक्रिय नसूनही सतत चर्चेत असणारी राखी सावंत कायमच काहीतरी नवीन धक्के द्यायला सोशल मीडियापुढे येत असते.

काहीच दिवसांपूर्वी राखीबद्दल मोठी अपडेट समोर आली ती म्हणजे.. राखीच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. 'रावडी राखी' (Rowdy Rakhi) असं या चित्रपटाचे नाव आहे. या सिनेमात राखी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती राखीचा भाऊ राकेश करणार आहे. नुकतंच रिलीज झालेलं गाणं आणि आगामी सिनेमा येत असल्याने राखी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

टॅग्स :Big BossRakhi Sawant