
Rakhi sawant: राखीच रडणं म्हणायचं की मस्करी! असा हंबरडा फोडला की स्टेजवरचे कोमातच...व्हिडिओ बघाच..
मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखी आणि तिच्या नवऱ्यामध्ये बरेच वाद सुरु आहेत. तिने आदिल अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिल सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर केसेस सुरु आहे.
तर दुसरीकडे राखी पुन्हा कामावर परतली आहे. तिने तिच्या कामावर लक्ष देण्याच ठरवलं आहे. गेले काही दिवस आपण राखीचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेले पाहिले ज्यात ती ज्यात ती रडतांना दिसली तर कधी बेशुद्ध झाल्याचंही दिसली. आजही सोशल मिडियावर तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राखी सावंतचं नवीन गाणं 'झूठा' हे रिलीज झालंय. या गाण्यातुन राखीने तिच्या आयुष्यातील नुकत्याच घडलेल्या घटनांचा उल्लेख केला आहे. तीन मिनिटाच्या गाण्यात तिनं तिची कथाच मांडल्याचं दिसतय.
नुकतीच राखी सावंत या गाण्याचे प्रमोशन करताना दिसली. यामध्ये राखी तिच्या गाण्याबद्दल आणि तिच्या आयूष्यातवरही बोलतांना दिसली. यासंबंधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखी सावंतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी तिने बोलतांनाच तिला रडू अनावर झालं अन् तिनं स्टेडवरच जोरात हंबरडा फोडला.
राखी सावंतच्या या दोन्ही व्हिडिओंवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले - काय झालं, ड्रामा संपला तर त्याचवेळी काहींनी राखीच्या लुकवरुनही तिला ट्रोल केलयं. तिच्या रडण्याच्या आवाजाने स्टेजवरची मंडळी कोमातच गेले असणार असंही काहींनी म्हटलयं. तर काही यूजर्सने राखी सावंतला उर्फीची फर्स्ट कॉपी म्हणून संबोधल आहे. तर काहींनी नेहमीप्रमाणेच या सर्व प्रकरणाला ड्रामा म्हटलं आहे.