राखी सावंतचं 'लग्ननाट्य' कधी संपणार? ड्रामा क्वीनचा नवीन खुलासा | Rakhi Sawant Statement On her Marriage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant Statement On her Marriage

राखी सावंतचं 'लग्ननाट्य' कधी संपणार? वाचा ड्रामा क्वीनचा नवीन खुलासा

बिग बॉस १५ (Big boss 15) ची स्पर्धक आणि सर्वात मोठी ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)पती रितेशपासून विभक्त झाली आहे. रितसर तिनं तिचं दुखणं जगजाहिर केलंही आहे आतापर्यंत. यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली होती. पण तिनं आता रितेशपासून आपण वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचा नवा खुलासा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार रितेश कायद्याच्या कचाट्यात सापडलाय,त्याच्यावर अनेक केसेस सुरू आहेत अन् त्याच्या बिझनेसमध्येही तो आपले सगळे पैसे घालवून बसला आहे. (Rakhi Sawant Statement On her Marriage)

हेही वाचा: करिश्मा-करिनाने वडिलांना घेतलंय दत्तक? रणधीर कपूर हे काय म्हणतायत...

राखीनं एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे,''माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं पण त्यानं मला सोडलं आहे हे सत्य आहे. बिग बॉस नंतर आम्ही एकत्र आमच्या मुंबईतील घरात राहत होतो. पण मग अचानक तो आपली बॅग भरून निघून गेला''. राखी पुढे म्हणाली,''रितेश खरंतर आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. कारण एकतर त्यानं माझ्याशी लग्न करण्याआधी त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता.आणि त्यामुळे आता तो माझ्यासोबत राहू शकत नाही. तसंच तो मला म्हणाला की,त्यानं बिझनेसमध्येही सगळे पैसे गमावले आहेत. तसंच माझ्यासोबत बिग बॉसच्या घरात त्यानं प्रवेश केल्यानंतर अनेक गोष्टींचे खुलासे झाले. मला घराबाहेर पडल्यानंतर कळालं की त्याचं लग्न झालंय आणि त्याला एक मुलगा देखील आहे. मी हे ऐकून पू्र्णपणे कोलमडले''.

हेही वाचा: मुंबईत कचऱ्याचं भाग्य उजळलं;चक्क बॉलीवूड अभिनेत्री बनली सफाई कामगार

ड्रामा क्वीन पुढे म्हणाली,''मला एका स्त्रीसोबत आणि तिच्या मुलासोबत अन्याय होऊ द्यायचा नव्हता. म्हणून मी हा विचार मनात घेऊन आता जगतेय की त्यानेच मला सोडलंय आणि आता आमच्यातलं नातं संपलं आहे. आम्ही व्हॉट्सअॅ्प मुळे एकत्र आलो,पुढे सहा महिने मसेजवर बोलत राहिलो. त्यानंतर त्यानं तो कुठे राहतो,त्याची आर्थिक संपत्ती दर्शवणाऱ्या बॅंक डीटेल्स आणि इतर काही गोष्टींची माहिती मला देऊन विश्वासात घेतलं. माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मी ही तयार होऊन तीन वर्षापूर्वी त्याच्याशी लग्न केलं. आणि जेव्हा मी जगासमोर हे सांगितलं तेव्हा कुणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. आणि म्हणून मग मीच रितेशला बिग बॉसमध्ये भाग घेण्यासाठी तयार केलं. माझं त्याच्यावर आजही प्रेम आहे. जर त्यानं पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि त्याला माझ्याकडे यायचं असेल तर मी आजही त्याची वाट पाहत आहे. पण जर तो पहिल्या पत्नी-मुलासोबत खूश असेल तर माझ्याकडून त्याला शुभेच्छा. पण माझ्यासाठी लग्न ही आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनीही यावरुन उगाचच माझी मस्करी उडवू नये''. आता कळलं असेल तुम्हालाही ड्रामा क्वीनचं 'लग्ननाट्य' नेमकं काय आहे ते.

Web Title: Rakhi Sawant New Statement On Her Marraige Ex Husband Ritesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top