
'सलमानभाई अंबानीपेक्षाही खुप श्रीमंत', राखीनं तोडले अकलेचे तारे..
राखी सावंत ही सध्या अनेक ही नेहमीच चर्चेत असते. ती सध्या तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळे चर्चेत आहे. तिने लग्नानंतर तिचा धर्म बदलला आणि आता ती फातिमा झाली आहे. रमजान सुरू आहे आणि तिने रोजा ही ठेवला आहे.
नुकतिच ती इफ्तार पार्टीतही दिसली. ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ते पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिची शाळाही घेतली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केलंय.
आता त्यातच राखीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. राखी सावंत आणि सलमानचं नातं तर सर्वांनाच माहित आहे.
राखी अनेकदा त्याला माझा भाऊ आहे असं म्हणते. राखी अनेकवेळा सलमानच्या बाजूने उभी राहते त्याच्याबद्दल बोललं जातं. म्हणाली की, 'सलमान खान एक दिग्गज आहे, त्याच्याबद्दल कोणीही असा वाईट विचार करू नये'.
राखी म्हणते की सलमान खान एक धार्मिक व्यक्ती आहे. गोरगरिबांना मदत करणारा तो महापुरुष आहे. सलमान भाई साठी प्रार्थना करा. तो लोकांसाठी खूप काही करतो. अंबानीपेक्षा तो किती श्रीमंत आहे माहीत आहे का?
सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे फुटू दे. त्यांची स्मृती संपुष्टात येवो. सलमान भाईसाठी ती प्रार्थना करणार आहे. कोणीही त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नये. अशी प्रार्थना ती करत आहे.
त्यानंतर ती म्हणते की, जे लोक सलमान भाईच्या विरोधात मुलाखती देत आहेत, त्यांना मला सांगायच आहे की, त्यांनी तुमचं काय केलं आहे. हात धुवून तुम्ही माझ्या भावाच्या मागे का पडला आहात? ता खुप महान आहे.
भाऊ खूप श्रीमंत आहे, तरीही तो वन बीएचकेमध्ये राहतो. लोकांसाठी खूप काही करतो. त्यांनी माझ्या आईसाठी इतकं केलं आहे की, त्याचं ऋण फेडता येणार नाही.
सध्या सोशल मिडियावर तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केलंय. राखी आणि तिच्या नवऱ्यामध्ये बरेच वाद सुरु आहेत त्यामुळेही ती चर्चेत आहे. तिने आदिल अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिल सध्या तुरुंगात आहे. तर राखी तिच्या कामात व्यस्त झाली आहे.