राखी सावंत म्हणते, 'माझ्याकडे दैवी शक्ती'

वृत्तसंस्था
रविवार, 25 ऑगस्ट 2019

- अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल मला दहा दिवसांपूर्वीच माहीत होते

मुंबई : माझ्याकडे दैवी शक्ती आहे. त्यामुळे अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल मला दहा दिवसांपूर्वीच माहीत होते, असे अभिनेत्री राखी सावंतने सांगितले. याबाबतचा व्हिडिओच राखी सावंतने शेअर केला आहे. त्यामुळे आता तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे काल (शनिवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. तसेच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींकडून त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर आता राखी सावंतने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये तिने सांगितले, की माझ्याकडे दैवी शक्ती आहे. त्यामुळे जेटलींच्या निधनाबद्दल मला दहा दिवसांपूर्वीच माहीत होते. जेटलीजी भाजपचे नेते होते. ते आज आपल्यात नाहीत. मी एक आठवड्यापूर्वी नाहीतर दहा दिवसांपूर्वीच हे म्हटले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

तसेच मला कधी स्वप्न येतात आणि मला भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टींची त्या घडण्याआधीच माहिती होते. हे कसे होते माहीत नाही. पण ही दैवी शक्ती आहे. मला ही दैवी शक्ती दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakhi Sawant says I have divine power