'त्याने समाधी घेतली'; बिचुकलेनं केलेल्या वक्तव्यावर राखी भडकली

तिला एका मुलाखतीत अभिजित बिचुकले बद्दल पश्न विचारण्यात आला होता.
Bigg Boss 15
Bigg Boss 15 esakal

बिग बॉस -15 (Bigg Boss 15) शो सध्या खूपच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर बिचुकलेने सलमान खानवर (Salman Khan) आरोप केले. सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला अशा शब्दांत बिचुकलेनं सलमानवर निशाणा साधला होता. यानंतर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसमधून बाहेर पडली आहे. अभिजीत बिचुकले शो मधून (Abhijeet Bichukale) बाहेर पडल्यानंतर सलमान खानवर केलेल्या वक्तव्यावर आता अभिनेत्री राखी सावंतनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिला एका मुलाखतीत अभिजित बिचुकले बद्दल पश्न विचारण्यात आला होता.

Bigg Boss 15
"आम्ही प्रत्येकाचं मन राखू शकत नाही"; तक्रारीवर महेश मांजरेकर यांची रोखठोक भूमिका

दरम्यान राखीन सावंतने नुकतीच पती रितेश सिंहसोबत मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये जेव्हा तिला अभिजीत बिचुकलेबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ती म्हणाली, 'सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर बिचुकलेने समाधी घेतली आहे. सलमान खानवर टीका केल्यानंतर त्याने स्वतःचे नुकसान करून घेतले आहे.' 'माझ्या सलमानबद्दल कोणी काहीही बोलले तर मी त्याला सोडणार नाही. ' राखीचा पती म्हणाला, 'अभिजीतनं असं म्हणायला नको होतं.'

Bigg Boss 15
नवाजुद्दीनच्या आलिशान 'नवाब' बंगल्यापुढे शाहरुखचा 'मन्नत' पडेल फिका!

अभिजीत बिचुकले आणि राखी सावंत घराबाहेर पडल्यानंतर सध्या सहा स्पर्धकांमध्ये बिग बॉसची स्पर्धा रंगली आहे. करण कुंद्रा, शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, निशांत भट, प्रतीक शेहजपाल आणि रश्मी देसाई हे बिग बॉसचे टॉप सहा स्पर्धक आहेत. बिग बॉस-15 चा ग्रँड फिनाले 29 ते 30 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com