राखीचा नवऱ्यावरच बलात्काराचा आरोप! त्यानं तर...| Rakhi Sawant Husband Adil Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rakhi sawant, rakhi sawant husband, adil khan

Rakhi Sawant Husband Adil Khan : राखीचा नवऱ्यावरच बलात्काराचा आरोप! त्यानं तर...

FIR Against Rakhi Sawant Husband Adil Khan : मनोरंजन विश्वात पुन्हा एका बातमीनं खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. ती बातमी आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतशी संबंधित. त्यांच्या लग्नाला महिनाही झाला नाही तोच त्यांच्यात घटस्फोट होण्याची चर्चा रंगली आहे. राखीनं पती आदिल खान दुरानीवर आता बलात्काराचा आरोप केले आहे. याशिवाय माझ्या आईच्या मृत्युला देखील तोच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतचं लग्न, तिचा संसार आणि तिच्या आईचे निधन याच्याशी संबंधित अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या. त्यात राखीनं सातत्यानं आदिलवर केलेल्या आरोपांनी ती लाईमलाईटमध्ये आल्याचे दिसून आले आहे. राखीनं आपल्या आईच्या आजारपणाच्या काळात देखील आदिलनं कोणत्याही प्रकारे साथ दिली नाही. याउलट तो कधीच तिला भेटायला आला नाही. माझ्या घरच्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतरही त्यानं पैसे दिले नाहीत असे म्हटले आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, आता एका इराणी विद्यार्थीनीनं आदिलवर बलात्काराचा आरोप केला आहे.त्यानुसार त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. राखीनं त्याच्याविरोधात म्हैसूरमध्ये तक्रार दिली आहे. आदिलच्या विरोधात आता ३७६, ४१७, ४२०, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या विद्यार्थीनीनं म्हैसूरमध्ये डॉक्टर ऑफ फार्मसीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला होता. त्यानंतर तिची आदिलशी ओळख झाली. ज्या फुडकोर्टमध्ये तिची आदिलशी ओळख झाली त्याचा आदिल मालक होता.

त्या विद्यार्थींनीनं असं म्हटलं आहे की, म्हैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये त्यानं आपल्यावर बलात्कार केला. त्या मुलीनं पाच महिन्यांपूर्वी जेव्हा आदिलला लग्नासाठी विचारले तेव्हा त्यानं नकार दिला. त्यानंतर त्या विद्यार्थीनीनं पोलिसांकडे धाव घेतली.

यापूर्वी राखीनं आदिलवर मारहाण करण्याचा आरोप देखील केला आहे. राखीनं आपल्या तक्रार अर्जामध्ये असे म्हटले आहे की, तो माझ्याशी चांगलं वागत नव्हता. त्यानं माझ्याशी गैरवर्तन केले होते. त्याचे बोलणे चुकीचे होते. तो बोलताना बऱ्याचदा अपशब्द वापरायचा. त्यानं खूप वेळा मला मारहाण केली होती. यावेळी राखीनं आदिलचे विवाहबाह्य संबंध होते असेही म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात आदिलची डोकेदुखी आणखी वाढणार असल्याची चर्चा आहे.