
Rakhi Sawant Video: अगं तुझा बुरखा कुठं गेला? राखी सावंतनं केली मलायकाची कॉपी तर नेटकऱ्यांनी घेतली शाळा..
राखी सावंत हे सोशल मिडियावरिल चर्चेतलं नावं आहे. राखी काय करेल याचा काही भरोसा नाही. राखीने आदिलसोबत लग्न केलं आणि त्याच्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला अन् स्वत:चं नाव फातिमा ठेवलं.
आता सध्या रमजानमध्ये ती रोजा करत आहे. इफ्तार पार्टीतचा एक व्हिडिओही व्हायरल झाली आहे. तिने सांगतिलं की ती पाच वेळा नमाजही अदा करते. पुर्ण नियम पाळत आहे.
आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती मलायका अरोराच्या चालीवर चालतांना दिसत आहे. मलायकाची चालण्याची स्टाईल तिला खूप आवडते, त्यामुळे आता तीही तिच्यासारखीच चालेल, असं ती या व्हिडिओत सांगितले आहे.
यानंतर पापाजीही तिला मलायका मॅम म्हणून हाक मारतात आणि राखीही एखाद्या अभिनेत्रीसारखी प्रतिक्रिया देते. राखीचा हा सगळा ड्रामा पाहिल्यानंतर नेटकरी मात्र भरलतेच भडकले आहेत.
राखी पापाराझींनी नुकतच जिमच्या बाहेर स्पॉट केलं. ती यावेळी जीमच्या ड्रेसमध्ये दिसली आणि नेहमीप्रमाणे पापाराझींशी बोलतांना ती वेब सीरिजच्या शूटिंगसाठी ती लखनौला रवाना होत असल्याची माहिती येथे दिली. लखनौ सरकारने तिला सुरक्षा पुरवावी अशी तिची इच्छा आहे.
त्यानंतर ती सांगते की तिला मलायकाचं चालणं खुप आवडचं त्यानंतर ती चालून दाखवते आणि आतापासून ती अशीच चालेल असंही सांगते.
तिचे हे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात अनेकांनी तिला नौटंकी म्हचलयं तर काहींनी तिला रमजानचा उपवास आणि हिजाबचे काय झाले? याबद्दल विचारलं आहे. खरच ही वेगळी नौटंकी आहे बाबा म्हटलंय तर काहींनी छान कॉपी केलयं असं म्हटलय आहे.