
राखी सावंतला शोमध्ये अनेकदा मी विवाहीत आहे असं बोलताना ऐकलं गेलं आहे पण तिच्या नवऱ्याला अजून कोणीही पाहिलेलं नाही.
मुंबई- बॉलिवूडची कॉन्ट्रव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या घरात आहे. बिग बॉसमध्ये राखीच्या येण्यामुळे प्रेक्षकांचं चांगल मनोरंजन होतंय असं दिसतंय. राखी घरातील सदस्यांसोबत कधी मजा मस्करी करते, कधी शिव्या देत भांडते तर कधी हात जोडून माफी मागते. राखी तिच्या याच स्टाईलमुळे प्रसिद्ध आहे. राखी तिच्या बिग बॉसच्या घरातील भांडणांप्रमाणेच आता खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आलीये. राखी सावंतला शोमध्ये अनेकदा मी विवाहीत आहे असं बोलताना ऐकलं गेलं आहे पण तिच्या नवऱ्याला अजून कोणीही पाहिलेलं नाही.
हे ही वाचा: अभिनेत्री मानसी नाईक प्रदीपसोबत 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात
राखीच्या पतीचं नाव रितेश असं आहे. तो लंडनमध्ये राहत असून एक व्यावसायिक आहे. राखी सावंतचा पती रितेशने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, 'माझ्या स्वार्थी हेतूमुळे मी आत्तापर्यंत जगासमोर आलेलो नाही. माझं लग्न आतापर्यंत लपवून ठेवलं होतं ही माझी चूक होती. मला असं वाटायचं की राखीशी माझी ओळख असणं आणि मी राखीशी लग्न करणं हे जर जगाला समजलं तर माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील. या तुमच्या माध्यमातून मी हे जगाला सांगू इच्छितो की, माझं राखी सावंतसोबत लग्न झालेलं आहे. तिने माझ्याशी लग्न करुन माझ्यावर उपकारच केले आहेत. राखी अतिशय उत्तम पत्नी आहे. ती एक चांगली मैत्रीणही आहे. मी तिला माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट सांगतो. माझ्या निर्णयामुळे आमचं लग्न लपवून ठेवण्यात आलं होतं. राखीनेही मला या निर्णयात साथ दिली. मला तिचा अभिमान वाटतो. पण आता मला एक संधी मिळाली आहे. मी ठरवलं आहे की मी सर्वांसमोर येईन आणि माझी ओळख सगळ्यांना सांगेन. मी माझा फायदा तोटा बघणार नाही. माझं आणि राखीचं सत्य सर्वांना सांगेन.'
एवढंच नाही तर रितेशने 'बिग बॉस'मधील निक्की तंबोळीने राखीबद्दल केलेल्या वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. रितेश म्हणाला, 'मी निक्की तांबोळीविरोधात केसही करू शकतो. पण तसं करणार नाही कारण तो एक गेम शो आहे.' निक्कीसोबतंच रितेशने मन्नु पंजाबीवर देखील त्याची नाराजी दर्शवली आहे. रितेशच्या म्हणण्यानुसार 'राखी निक्कीबद्दल जे बोलली त्यात चुकीचं काय आहे? निक्की कधीच कोणा मुलीला कोप-याच घेऊन बसत नाही. राखी अशी कोणतीच गोष्ट बोलली नाही जी शोमध्ये वाईट दिसेल. '
rakhi sawants husband comes out in her support