रकुल मालदीवच्या किनारी, काय भन्नाट फोटोशुट केलयं; नजर हटणार नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी रकुल प्रीत सिंह ही गेल्या काही दिवसांपासून मालदीवला सुट्टी इंजॉय करत आहे. त्याचे फोटो तिने व्हायरल केले आहेत.

मुंबई -अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या फोटोशुटमुळे चांगलीच व्हायरल झाली आहे. मालदीवच्य़ा निळ्याशार समुद्राच्या किनारी तिने केलेलं फोटोशुट सोशल मीडिय़ावर चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. तिनं केलेला व्हिडीओ हिट होतो आहे. सध्या रकुल प्रीत सिंह ही आपल्या भावाबरोबर मालदीवला गेली आहे.

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी रकुल प्रीत सिंह ही गेल्या काही दिवसांपासून मालदीवला सुट्टी इंजॉय करत आहे. त्याचे फोटो तिने व्हायरल केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

 

सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या भावाबरोबर समुद्रकिनारी असल्याचे दिसून येत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

इंस्टाग्रामच्या स्टोरी बोर्डवर तिने तो व्हिडीओ शेयर केला आहे.रकुलने आपल्या अभिनयाची सुरुवात एका कन्नड चित्रपटापासून केली होती. त्यानंतर ती तमिळ चित्रपटात गेली.

2014 मध्ये तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यात ती अय्यारी, दे दे प्यार दे, सिध्दार्थ मल्होत्राच्या मरजावा चित्रपटात ती दिसली होती. आता ती लवकरच इंडियन 2 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Rakul Preet Singh's Holiday Glow Is Brighter Than The Maldives Sun

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakul Preet Singh Holiday Glow on Maldives Sun