'ही' अभिनेत्री स्वतः महिला असून म्हणते 'माझा महिला दिनावर विश्वास नाही'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने जागतिक महिला दिनावर बोलताना एक मोठा खुलासा केलाय...मी 'महिला दिन' सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसल्याचं तिने म्हटलंय...

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने जागतिक महिला दिनावर बोलताना एक मोठा खुलासा केलाय...मी महिला दिन सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसल्याचं तिने म्हटलंय...

धक्कादायक: शिल्पा शेट्टी-कुंद्रा आणि पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल..

रकुल म्हणते की, 'आपण पुरुष दिवस तर साजरा करत नाही मग केवळ एक दिवसच का महिला दिवस साजरा करतो? माझं अस मत आहे की, आपण प्रत्येक दिवस हा महिला असल्याचा अभिमान बाळगत साजरा करायला हवा...इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या आसपासच्या सगळ्या महिलांचा सन्मान देखील केला पाहिजे..असं केलं तर खऱ्या अर्थाने आपण महिला दिन साजरा करू शकतो...'

'रकुल बद्दल सांगायचं झालं तर रकुल शेवटची या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'शिमला मिर्च' या सिनेमात झळकली होती..रमेश सिप्पी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात राजकुमार राव आणि हेमा मालिनी यांची देखील महत्वाची भूमिका होती...लवकरच रकुल जॉन अब्राहम सोबत 'अटॅक' या सिनेमात दिसून येईल...

Image result for rakul preet with john abraham in aatack

rakul preet singh talks about womens day says why we should celebrate it once in a year


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rakul preet singh talks about womens day says why we should celebrate it once in a year