राम आणि साक्षी येताहेत... 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येतात ते अभिनेता राम कपूर व अभिनेत्री साक्षी तंवर. आता साक्षी तंवर म्हणे रामची दारू सोडवणार आहे अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे. हे ऐकल्यावर राम कपूरच्या चाहत्यांना त्याची फारच चिंता वाटू लागलीय; पण तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीच नाही. खरं तर हे दोघं अल्ट बालाजी प्रॉडक्‍शनच्या "कर ले तू भी मोहब्बत' या वेबसिरीजमध्ये एकत्र येत आहेत. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिरीजमध्ये राम कपूरने करण खन्ना नावाच्या एका सुपरस्टारची भूमिका साकारली आहे. जो दारूच्या आहारी जातो. ही समस्या दूर करण्यासाठी तो एका थेरपिस्टची मदत घेतो.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येतात ते अभिनेता राम कपूर व अभिनेत्री साक्षी तंवर. आता साक्षी तंवर म्हणे रामची दारू सोडवणार आहे अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे. हे ऐकल्यावर राम कपूरच्या चाहत्यांना त्याची फारच चिंता वाटू लागलीय; पण तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीच नाही. खरं तर हे दोघं अल्ट बालाजी प्रॉडक्‍शनच्या "कर ले तू भी मोहब्बत' या वेबसिरीजमध्ये एकत्र येत आहेत. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिरीजमध्ये राम कपूरने करण खन्ना नावाच्या एका सुपरस्टारची भूमिका साकारली आहे. जो दारूच्या आहारी जातो. ही समस्या दूर करण्यासाठी तो एका थेरपिस्टची मदत घेतो. त्या थेरपिस्टच्या भूमिकेमध्ये साक्षी तंवर दिसणार आहे. सुरुवातीला थोडीशी भांडणं आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात होताना पाहायला मिळणार आहे. 14 भागांच्या या वेबसीरिजचा पहिला एपिसोड 16 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "बडे अच्छे लगते है' ही मालिका ज्यांनी पाहिलीय त्यांच्या या वेब सिरीजच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवणी ताज्या होतील... ट्रेलरमध्येच त्यांचा प्रेमात पाडणारा अंदाज पाहता ही वेब मालिका गाजणार हे मात्र नक्की...  
 

Web Title: Ram and sakshi come back