‘कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का?’; तांडव पाहू नका 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 17 January 2021

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सीरिजमधून ते दृश्य हटवले पाहिजेत हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज 9 भागांची आहे. 

मुंबई - आपल्याकडे प्रदर्शित होणा-या अनेक मालिका किंवा चित्रपट या वादाच्या भोव-यात सापडताना दिसतात. यापैकी काही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाद तयार करतात. सोशल मीडियावर त्याबद्दल पोस्ट शेयर करुन जनसामान्यांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. मागील वर्षीही प्रदर्शित झालेल्या अनेक मालिका आणि चित्रपटांना वादाची किनार होती. त्यात लक्ष्मी, अ सुटेबल बॉय, मिर्झापूर, द सेक्रेड गेम्स, यासारखी कित्येक नावे याबद्दल सांगता येतील. आता नव्यानं प्रदर्शित झालेला तांडव ही टीकेचा विषय होतो आहे.

सैफ अली खान मुख्य अभिनेता असलेल्या या मालिकेतून हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्यात आल्याची टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली असून त्या मालिकेवर बहिष्कार घालण्याची मागणी प्रेक्षकांना केली आहे. तांडव या मालिकेतून हिंदू देव देवतांचा अपमान झाल्याची कडवट प्रतिक्रिया नेटक-यांनी दिली आहे. मालिकेच्या माध्यमातून जेएनयुचे केलेले समर्थन, देवतांच्या तोंडी घातलेले वादग्रस्त संवाद यामुळे त्यावर नेटक-यांनी तोंडसुख घेतले आहे. क्रिएटिव्हीटी आणि कलेच्या नावाखाली प्रोप्रगंडा करण्याचे काम सुरु केले आहे. असेही काहींनी ही मालिका प्रदर्शित झाल्यावर म्हटले होते.

राम कदम यांनी सोशल मीडियावर या मालिकेबद्दल लिहिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता जीशान अय्यूबने जाहीरपणे माफी मागावी. तसेच सीरिजमध्ये योग्य ते बदल करण्यात येत नाही तोपर्यंत ‘तांडव’वर बहिष्कार टाका असे ट्विट राम कदम यांनी केलं आहे. ‘तांडव’च्या पहिल्याच एपिसोडमध्ये भगवान शंकर आणि श्रीराम या हिंदू देव-देवतांची अवमान करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर सोशल मीडियावर #BoycottBollywood आणि #BoycottTandav हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड झाल्याचे दिसून आले आहे.

Image may contain: 3 people, beard, text that says 'Ram Kadam राम कदम @ramkadam Jan 17, 2021 Why is it becoming a trend amongst films and web series makers to demean Hindu gods? atest culprit seems to be the senies #landav. #SaifAliKhan again part of film or series which attempts to target Hindu deities. Director Ali Abbas Zafar needs to remove that scene which mocks'

कदम म्हणाले, दरवेळी चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून हिंदू देव-देवतांचा अपमान का होतो, नवीन वेब सीरिज तांडवमध्ये  सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच  सीरिजमध्ये हिंदू बांधवांच्या भावना दुखावलया गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सीरिजमधून ते दृश्य हटवले पाहिजेत  हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज 9 भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.

Vijay Sethupathi Birthday: पिझ्झा ते 96; सुपरस्टार विजयचे डिलक्स परफॉर्मन्स!

पहिल्या एपिसोडमधील सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये अभिनेता झिशान आयुब हा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा करणारा तरुण भगवान शंकराच्या भूमिकेत वावरताना दिसला आहे. त्यानं यावेळी काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. यावरुन त्याला टीकेला सामोरे जावे लागले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Kadam demand to boycott new web series Tandav starred Mohammad Zeeshan Ayyub khan saif ali khan