रामायणात 'आर्य सुमंत' साकारणारे चंद्रशेखर वैद्य काळाच्या पडद्याआड

वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
रामायणात 'आर्य सुमंत' साकारणारे चंद्रशेखर वैद्य काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वैद्य Chandrashekhar Vaidya यांचे बुधवारी (१६ जून) निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. रामानंद सागर यांच्या 'रामायण' Ramayan या पौराणिक मालिकेत त्यांनी राजा दशरथ यांचे महामंत्री आर्य सुमंत ही व्यक्तिरेखा साकारली होती. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचा मुलगा प्राध्यापक अशोक चंद्रशेखर यांनी दिली. (ramayana aarya sumant actor Chandrashekhar Vaidya dies at 98 in Mumbai)

चंद्रशेखर यांनी 'काली टोपी लाल रुमाल', 'बरादरी', 'स्ट्रिट सिंगर', 'रुस्तम ए बगदाद' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. १९६४ साली 'चा चा चा' या चित्रपटातून 'चा चा चा' या डान्स प्रकाराची ओळख त्यांनी भारतीय सिनेसृष्ट्रीला करून दिली. १९५४ साली व्ही. शांताराम यांच्या 'औरत तेरी यहीं कहानी' या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. जवळपास १०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.

रामायणात 'आर्य सुमंत' साकारणारे चंद्रशेखर वैद्य काळाच्या पडद्याआड
सुप्रसिद्ध छायाचित्रकार समीर बेलवलकर यांचा प्रेरणादायी प्रवास; पाहा व्हिडिओ

रामायणातील भूमिका गाजली

आर्य सुमंत हे राजा दशरथ यांच्या राजदरबारातील आठवे मंत्री होते. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी राजा दशरथ त्यांचाच सल्ला घ्यायचे. राम, सीता आणि लक्ष्मण यांना वनवासात जाताना अयोध्यापासून गंगेच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवणारे आर्य सुमंतच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com