Arun Govil at Ayodhya: रामायण फेम अरुण अयोध्येत पोहोचताच चाहत्यांचा आनंद गगनात... केलं असं काही की... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 arun govil, Arun Govil at Ayodhya, ramayana full episaode, ramayan

Arun Govil at Ayodhya: 'रामायण' फेम अरुण अयोध्येत पोहोचताच चाहत्यांचा आनंद गगनात... केलं असं काही की...

Arun Govil at Ayodhya News: रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांची कोणतीही वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. प्रभु रामचंद्रांच्या भूमिकेने अरुण गोविल यांना फॅन्सकडून भरपूर प्रेम आणि सन्मान मिळाला. अरुण गोवील यांना आजही जगभरातील तमाम चाहते श्रीराम म्हणून ओळखतात. याचा अनुभव पुन्हा आला जेव्हा अरुण गोविल अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

('Ramayana' fame Arun govil reached at Ayodhya, fans become very happy)

रामानंद सागरचे रामायण 1987 मध्ये पहिल्यांदा टीव्ही वर आले. आजही लोक टीव्हीवर श्री रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलला श्री रामच मानतात. नुकतेच 'श्री राम' साकारणारे अरुण गोविल राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचले. अरुण गोविल शुक्रवारी म्हणजेच 21 एप्रिल रोजी अयोध्या शहरात पोहोचले.

अरुण गोविल अयोध्येत का गेले याचं एक खास कारण आहे. राम मंदिर आंदोलनावर चित्रपट बनवला जात आहे. यामध्ये 'श्री राम' म्हणजेच अरुण गोविल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शूटिंग सुरू करण्यापूर्वी अरुण राम लल्लाला भेटायला अयोध्येत गेले होते. राम मंदिर आंदोलनाची मुख्य केंद्रे असलेल्या ठिकाणीच शूटिंग केले जात आहे. शूटिंगसाठी दिगंबर आखाडा, आचारी मंदिर, दशरत महलअसा ठिकाणांची निवड करण्यात आली.

मीडिया रिपोर्टनुसार, मंदिराच्या वास्तूची पडझड, मंदिराबाबतचा निर्णय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिर उभारणीचे भूमिपूजन अशा अनेक गोष्टी चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरुण गोविलने सांगितले की, त्याने चित्रपटात साधूची भूमिका साकारली आहे. राम मंदिर बांधले जावे आणि त्याला आपल्या प्रभू रामाचे दर्शन व्हावे, अशी त्याची मनापासून इच्छा आहे. आज जे राम मंदिर उभारले जात आहे, त्यामागे 500 वर्षांचा संघर्ष आहे, त्या मंदिरासाठी लाखोंनी बलिदान दिले आहे, असेही गोविल म्हणाले. अरुण गोविल यांना लवकरच मोठ्या पडद्यावर पाहण्यात त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :Marathi News Bollywood