Ranbir kapoor: नवऱ्याचा वाढदिवस ठरला लकी! आलियाला मिळाला हा मानाचा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rambir kapoor birthday Alia Bhatt wins Modern Woman, A Time 100 Impact Award

Ranbir kapoor: नवऱ्याचा वाढदिवस ठरला लकी! आलियाला मिळाला हा मानाचा पुरस्कार

ranbir kapoor birthday: बॉलीवूडमधील सध्या चांगलं चर्चेत असलेलं क्यूट कपल म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच रणबीर आणि आलियाच्या (alia bhatt) घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. दोघेही लवकरच आई बाबा होणार आहेत. शिवाय त्यांच्या चित्रपटांची आणि नव्या घराचीही चर्चा आहे. अशातच आज रणबीरच्या वाढदिवसानिमित्त त्या दोघांनाही एक छानशी गुड न्यूज मिळाली आहे.

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरचा आज ४०वा वाढदिवस. रणबीर आणि त्यांची पत्नी आलिया यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. किंवा आलियाला रणबीरचा वाढदिवस लकी ठरला असंही म्हणता येईल. कारण आजच 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी (Time 100 Impact Award) आलियाची निवड झाली आहे. हा अत्यंत मानाचा असा पुरस्कार आलियाने पटकावला आहे.  

आलियाने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आलियाला हा पुरस्कार मिळाल्याने सोनी राजदानदेखील आनंदी झाल्या आहेत. 2022 मध्ये आलिया 'गंगूबाई काठियावडी', 'आरआरआर', 'डार्लिंग्स', 'ब्रह्मास्त्र' अशा हिट सिनेमांत आपली दमदार कामगिरी दाखवली. म्हणूनच तिचा सन्मान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार 2 ऑक्टोबरला सिंगापुरमध्ये एका भव्य सोहळ्यात देण्यात येणार आहे. आलियाने सोशल मीडियावर पुरस्काराचं सन्मानपत्र शेअर केलं आहे. आलियाच्या या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :Ranbir KapoorAlia Bhatt