esakal | "मी बुडेन का, अशी भीती होती"; 'शिवगामी'ने सांगितला त्या थरारक दृश्याचा अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

ramya krishnan

"मी बुडेन का, अशी भीती होती"; 'शिवगामी'ने सांगितला त्या थरारक दृश्याचा अनुभव

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'बाहुबली: द बिगनिंग' आणि 'बाहुबली: कन्क्लुजन' Baahubali या दोन्ही चित्रपटांमधील कलाकारांचं दमदार अभिनय, दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचं उत्तम दिग्दर्शन यांची सर्वाधिक चर्चा झाली. या बहुचर्चित चित्रपटात अभिनेत्री रम्या कृष्णन Ramya Krishnan हिने बाहुबलीच्या आईची म्हणजेच शिवगामीची Sivagami भूमिका साकारली होती. माहिष्मती साम्राज्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निडर मातेची भूमिका तिने साकारली होती. मात्र या चित्रपटातील एक दृश्य साकारताना रम्या खूप घाबरली होती. एका मुलाखतीत रम्याने शूटिंगचा किस्सा सांगितला होता. शिवगामी एका हातात बाळाला पकडून पाण्यात उभी असल्याचं हे दृश्य होतं.

'बाहुबली' चित्रपटातील हे दृश्य छलकुडी धबधब्याखाली चित्रीत करण्यात आलं होतं. याविषयी रम्या म्हणाली, "मी पाण्यात असताना एका हातात बाळाला पकडून मला ते दृश्य चित्रीत करायचं होतं. पाण्याचा प्रवाह जोरदार होता आणि मला पूर्ण पाण्याच्या आत उभं राहायचं होतं. केरळमधील तो धबधबा अत्यंत सुंदर आहे. पण असं थरारक दृश्य साकारणं फार कठीण होतं. त्या प्रवाहात मी बुडून जाईन का, असा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवून गेला होता. पण त्या भीतीतही मला चेहऱ्यावर निडर भाव आणायचे होते."

हेही वाचा: ''केबीसी'मध्ये विचारलेला प्रश्न चुकीचा, उत्तरही चुकीचं'; प्रेक्षकाचा दावा

रम्याने आतापर्यंत पाच विविध भाषांमध्ये जवळपास २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रम्याचा जन्म १५ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये झाला. २००३ मध्ये तिने तेलुगू दिग्दर्शक कृष्णा वामसीशी लग्नगाठ बांधली. दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच रम्याने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली.

loading image
go to top