बाहुबली फेम राणा दग्गुबतीचा मिहीकासोबत पार पडला साखरपुडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

राणाने मिहीका बजाजसोबतचे साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात दोघेंही अगदी आनंदात दिसून येत आहेत.

मुंबई- बाहुबली स्टार अभिनेता राणा दग्गुबतीने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड मिहिका बजाजला लग्नाची मागणी घातली होती आणि त्यावर मिहिकाने होकार देखील दिला असल्याची पोस्ट त्याच्या सोशल मिडियावर शेअर केली होती. नुकताच या दोघांनी साखरपुडा केला आहे. राणाने मिहीका बजाजसोबतचे साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात दोघेंही अगदी आनंदात दिसून येत आहेत.

हे ही वाचा: अनुष्का शर्माला बजावली कायदेशीर नोटीस, वेब सिरीजमध्ये जातीयवादी शिवीचा वापर

राणाने मिहीकासोबतचे साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं आहे, आणि हे अधिकृतरित्या पार पडलं. साखरपुड्याच्या या पोस्टनंतर राणाच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. याआधी राणाने गर्लफ्रेंड मिहिकासोबत फोटो शेअर करुन चाहत्यांना सरप्राईज दिलं होतं. त्यावेळी राणाच्या ती हो म्हणाली या कॅप्शनलाही त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता. आणि आता राणाने अधिकृतरित्या साखरपुडा पार पडल्याचं जाहीर केलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

And it’s official!!

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

दोघांचे हे साखरपुड्याचे सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. साऊथच्या कलाकारांसोबतंच त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छा देऊन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मात्र अजुनही हे दोघं कधी लग्न करणार याची तारीख कळालेली नाही. हे दोघंही वर्षाच्या शेवटापर्यंत लग्न करतील अशी चर्चा आहे. 

सगाई सेरेमनी पर होने वाली बीवी को ...

मिहीका इवेंट मॅनेजमेंट कंपनीची संस्थापक आहे सोबतंच ती एका स्टुडिओची मालकीणही आहे. मिहीकाची आई बंटी बजाज यांचा ज्वेलरीचा बिझनेस आहे. मिहीकाने मुंबईत इंटीरियर डिझाईनचा डिप्लोमा केलाय. तर राणा दग्गुबाती तेलुगु आणि तमिळचा सुपरस्टार असून बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे.    

rana daggubati and miheeka bajaj officially engaged see pics  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rana daggubati and miheeka bajaj officially engaged see pics