'भल्लालदेव'ने 'अमरेंद्र'ला कशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

राणाने आज ट्विट करत प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राणाने प्रभासला एक शानदार व्यक्तिमत्व म्हटले आहे. तसेच त्याने त्याच्यासोबतच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामधून त्यांच्या मैत्रीबद्दलची माहिती समोर येते. 'साहो' चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री असलेल्या श्रद्धा कपूरनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बाहुबली या चित्रपटातील प्रसिद्ध जोडी प्रभास आणि राणा डुगुबत्ती यांच्यातील वैर आपण पडद्यावर पाहिले असेल. पण, आज (23 ऑक्टोबर) प्रभासच्या वाढदिवसानिमित्त राणा डुगुबत्तीने त्याच्यासोबत खास फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिणेतील प्रसिद्ध कलाकार असलेला प्रभास आज 38 वा वाढदिवस साजरा करत असून, त्याने आपल्या वाढदिवसानिमित्त आगामी 'साहो' या चित्रपटाचो पोस्टर प्रसिद्ध केले आहे. प्रभासवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, राणा डुगुबत्ती आणि त्याचे मैत्रीचे नाते विशेष आहे. बाहुबली चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी बराच वेळ एकत्र घालविला आहे.

राणाने आज ट्विट करत प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राणाने प्रभासला एक शानदार व्यक्तिमत्व म्हटले आहे. तसेच त्याने त्याच्यासोबतच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामधून त्यांच्या मैत्रीबद्दलची माहिती समोर येते. 'साहो' चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री असलेल्या श्रद्धा कपूरनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: rana daggubati wishes prabhas on his birthday