Ranbir Kapoor: 'मी काही तिचा फॅन नाही',उर्फीच्या फॅशनबद्दल रणबीरचं स्पष्टचं मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor on Urfi javed

Ranbir Kapoor: 'मी काही तिचा फॅन नाही',उर्फीच्या फॅशनबद्दल रणबीरचं स्पष्टचं मत

बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. तिची फॅशन कुणाला आवडो किंवा ना आवडो ती काही तिच्या फॅशनचा अविष्कार करणं थांबवत नाही. त्याचबरोबर ती तिच्या बेधडक वक्तव्यामुळेही नेहमीच चर्चेत असते.

अनेक मोठ्या सेलिब्रिटींनीही उर्फीच्या फॅशन सेन्सची प्रशंसा केली आहे, तर अनेकांना तिचा ड्रेसिंग सेन्स मूर्खपणाचा वाटतो. नेटकरी तर नेहमीच तिला तिच्या या फॅशनमुळं ट्रोल करत असतात. पण उर्फीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. काही दिवसांपुर्वी तिच्या या फॅशनमुळं ती वादाच्या भोवऱ्यातही सापडली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही तिच्यावर निशाणा साधला होता. पण ऐकेल ती उर्फी कसली. तिनेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं.

आता बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनेही उर्फीच्या फॅशन सेन्सवर भाष्य केले आहे . अलीकडेच रणबीर त्याची बहीण करीना कपूर खानच्या चॅट शो 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये पोहोचला होता.

यावेळी, करीनाने रणबीरसोबत एक गेम खेळला जिथे त्याला काही सेलिब्रिटींचे चेहरे नसलेले फोटो दाखवले गेले. कपडे पाहून रणबीरला त्या सेलिब्रिटींच्या फॅशनबद्दल आणि त्याच्याबद्दल सांगायचं होत.

शोच्या या सेगमेंटमध्ये जेव्हा करीनाने उर्फीचा फोटो दाखवला तेव्हा रणबीरने विचारले, ही तू आहेस का? तर करीना म्हणाली की मी तिथे असते काश... मला वाटतं की तुला माहित आहे की ही कोण आहे. मग रणबीर म्हणतो ही उर्फी आहे का? ज्यावर करीना हो म्हणते.

यावर आपलं मत मांडताना रणबीर म्हणातो की, 'मी अशा प्रकारच्या फॅशनचा फॅन नाही, पण मला वाटतं की तुम्हाला जर त्यात आराम वाटत असेल तर ठीक आहे.'

रणवीर सिंग, प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता यांनी उर्फीच्या फॅशन सेन्सची जोरदार प्रशंसा केली आहे.