आलिया आणि रणबीरचं झालं लग्न?

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

सध्या रणबीर आणि आलियाच्या लग्न सोहळ्याचा एक फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय. चाहत्यांना हा फोटो पाहून आनंद होत आहे.

मुंबई : बॉलिवूडचं क्युट कपल आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यावर नेटकरी फिदा आहेत. या दोघांनी लवकरच लग्न करावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. सुरुवातीच्या काळात हे अफेअर त्यांनी लपवून ठेवलं होतं. मात्र प्रेमाची कबूली दिल्यानंतर हे कपल अनेक कार्यक्रमात, पार्टी आणि शोमध्ये एकत्र दिसून आलं. एवढचं काय तर दोन्ही कुटुंबांची जवळीक वाढली असून आलिया आणि रणबीर नातेवाईकांसोबतही वेळ घालवताना दिसतात.

alia bhatt and ranbir kapoor ambani house

चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती या क्युट कपलच्या लग्नाची. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चा नेहमीच एकायला मिळतात. सध्या रणबीर आणि आलियाच्या लग्न सोहळ्याचा एक फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय. चाहत्यांना हा फोटो पाहून आनंद होत आहे. कोणी एका चाहत्याने आलिया आणि रणबीरच्या छायाचित्राचं फोटोशॉप केले आहे. हे एकुन तुमची थोडी निराशा होईल मात्र त्यांच्या लग्नाचा फोटो खोटा असून तो एडिट केलेला आहे.

आलियाने एका ब्रॅंडसाठी नववधूचा लूक परिधान केला होता. त्याच्या अॅडसाठी करण्यात आलेल्या फोटोंना एडिट करुन रणबीरचा चेहरा लावण्यात आला. दिगर्दशक अयान मुखर्जीचा आगामी चित्रपट 'ब्रम्हात्र' मध्ये आलिया आणि रणबीर एकत्र दिसणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranbir Kapoor and Alia Bhatt fans can't wait for their wedding, create an imaginary Shaadi pic on social media