रणबीर-आलियाने सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर सुरु केलं 'या' सिनेमासाठी काम

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 11 September 2020

रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे देखील सहा महिन्यांच्या मोठ्या ब्रेकनंतर आता कामाला सुरुवात करत आहेत. या दोघांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या डबिंगला सुरुवात केली आहे. 

मुंबई- लॉकडाऊन संपल्यानंतर आणि सिनेमांच्या शूटींगला परवानगी मिळाल्यानंतर कित्येक कलाकारांनी सिनेमांच्या शूटींगला सुरुवात केली आहे. यातंच आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे देखील सहा महिन्यांच्या मोठ्या ब्रेकनंतर आता कामाला सुरुवात करत आहेत. या दोघांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या डबिंगला सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा:  अक्षय कुमार 'इन टू द वाईल्ड..' शोमध्ये प्यायला हत्तीच्या शौचची चहा, वाचा मजेदार किस्सा  

रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र सिनेमाच्या डबिंगसाठी तयार आहेत. या सिनेमाचं शूटींग अजुनही बाकी आहे मात्र यासाठी १० ते १२ दिवसंच लागणार आहेत. जोपर्यंत शूटींग सुरु होत नाही तोपर्यंत या दोघांनी पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमाचं इतर देशातील शूटींग पूर्ण झालं आहे आणि सिनेमाचं शेवटचं शेड्युल मुंबईत होणार होतं ते लॉकडाऊनमुळे थांबल आहे. सिनेमाच्या शूटींगला केवळ १० ते १२ दिवस लागणार आहेत ज्यामध्ये रणबीर आणि आलियावर चित्रीत होणा-या एका गाण्याचा समावेश आहे. या शेवटच्या शेड्युलमध्ये रणबीर आणि आलियासोबत अमिताभ बच्चनदेखील सामिल होऊन महत्वाचे काही सीन्स पूर्ण करणार आहेत. 

Big B, Alia, Ranbir prep for 'Brahmastra'

हा एक सुपरहिरो सिनेमा असेल ज्यामध्ये रणबीर शिवाच्या भूमिकेत दिसून येईल. तर अमिताभ बच्चन शिवाचे गुरु ब्रह्माची भूमिका साकरतील. सुपरहिरो सिनेमा असल्याने साहजिकंच स्पेशल इफेक्ट्स आणि वीएफएक्सचा भरमसाठ वापर केला जाणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आयान मुखर्जी करत आहे आणि निर्मिती करण जोहरची आहे. रणबीर, आलिया आणि अमिताभ यांच्यासोबत या सिनेमात नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया, मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसतील तर शाहरुख देखील कॅमिओ करताना दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये जास्त उत्सुकता आहे.    

ranbir kapoor and alia bhatt work start for karan johar film brahmastra  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranbir kapoor and alia bhatt work start for karan johar film brahmastra