'मुलीचं डायपर बदलण्याची वेळ येते तेव्हा...' रणबीरच्या प्रतिक्रियेनं वेगळीच चर्चा! Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor Bollywood Actor Sharadha Kapoor

Ranbir Kapoor : 'मुलीचं डायपर बदलण्याची वेळ येते तेव्हा...' रणबीरच्या प्रतिक्रियेनं वेगळीच चर्चा!

Ranbir Kapoor Bollywood Actor Sharadha Kapoor : खरं तर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या तू झुठी मैं मक्कार नावाच्या चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. या चित्रपटाचे गेल्या काही दिवसांत जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. मात्र नेमक्या कोणत्या कारणांमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली याचे कारण समोर आलेले नाही.

यासगळ्यात रणबीर हा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. रणबीर आणि आलियाच्या लाडक्या लेकीची राहाची चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी दोन अज्ञातांनी आलियाच्या घरातील फोटो व्हायरल केले होते. त्यामुळे आलिया ही चांगलीच संतापली होती. आम्हा कलाकारांना घरात देखील प्रायव्हसी मिळत नसेल तर यासारखी चिंतेची दुसरी बाब नाही. लोकं अशाप्रकारे वागत असल्यास काय म्हणावं, असा प्रश्न आलियानं उपस्थित केला होता.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

आता रणबीर तू झुठी मैं मक्कारच्या निमित्तानं एका मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर बोलला आहे. त्या मुलाखतीचा काही भाग व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. यावेळी रणबीरनं त्याची मुलगी राहा सोबतच्या काही गोष्टी शेयर केल्या आहेत. तो म्हणतो मला जेव्हा डायपर बदलण्याची वेळ येते तेव्हा अनेकदा गोंधळ होतो. ते व्यवस्थित काढणे, ते लावणे आणि जुने डायपर बदलणे हे सारं किचकट आहे.

मला बऱ्याचदा हे सारं रॉकेट सायन्स वाटतं अशी प्रतिक्रिया रणबीरनं दिली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेची चर्चा होताना दिसत आहे. याच मुलाखतीमध्ये रणबीरनं मला मुलीला आलियासारखं होऊ द्यायचं नाही. असेही म्हटलं आहे. याचे कारण घरात एक आलिया पुरेशी आहे. आणखी दुसरी एक नको. असे सांगितल्यावर उपस्थितांनी रणबीरला मोठी दाद दिली. राहाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिचा पहिला फोटो मीच घेतला असे सांगून रणबीरनं सांगितलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं चाहत्यांनी कौतूक केलं आहे.

मी आलियाला बोललो होतो की, ती तुझ्यासारखी दिसते. त्यामुळे मला दिसण्याबाबत काही चिंता नाही पण तिचे व्यक्तिमत्व हे माझ्यासारखे हवे. असे मी आलियाला बोललो आहे. असे रणबीरनं सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.