लॉकडाऊननंतर रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' नाही तर 'हा' सिनेमा आधी होऊ शकतो रिलीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

लॉकडाऊन संपल्यानंतर चित्रपटगृह सुरु होणार या आशेवर अनेक निर्माते त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफीसवर रिलीज करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे 'ब्रह्मास्त्र.' 

मुंबई- लॉकडाऊनमुळे बॉलीवूडमधल्या अनेक बड्या स्टार्सचे सिनेमे रखडले आहेत. त्यात सगळ्यात जास्त सिनेमे तर अभिनेता अक्षय कुमारचे आहेत. मात्र या सिनेमांसोबतंच आणखी एका सिनेमाची चर्चा आहे तो म्हणजे रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाची. लॉकडाऊन संपल्यानंतर चित्रपटगृह सुरु होणार या आशेवर अनेक निर्माते त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफीसवर रिलीज करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे 'ब्रह्मास्त्र.' 

हे ही वाचा: अनुष्का शर्माला तिच्या घरात दिसला डायनासोर, व्हिडिओ केला शेअर

'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा रणबीर कपूरच्या करिअरमधील मोठ्या आणि महत्वांच्या सिनेमांपौकी एक समजला जातोय..हा सिनेमा सुरुवातीपासूनंच चर्चेत आहे. याचे वेगवेगळे भाग देखील बनणार आहेत. मात्र आता सगळ्यात आधी पहिला भाग रिलीज करण्यासाठी निर्मात्यांना तारीखेची अडचण येत आहे. याचं कारण म्हणजे या सिनेमाचा अजुन बराचसा भाग शूट करणं बाकी आहे.

लॉकडाऊननंतर लगेचच अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांना तशी घाई नाहीये. याचदरम्यान अशी चर्चा आहे की लॉकडाऊननंतर रणबीरचा दुसरा सिनेमा 'शमशेरा' रिलीज होऊ शकतो. 'शमशेरा' सिनेमातही रणबीरची भूमिका खूपंच खास आहे. आणि या सिनेमाकडून रणबीरलाही अनेक अपेक्षा आहेत.  

Ranbir Kapoor looks unrecognisable in these leaked pics from ...

'शमशेरा' सिनेमा आता पोस्ट प्रोडक्शनमध्ये असून या सिनेमाची टीम हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी जोरदार तयारी करतेय. तर दुसरीकडे 'ब्रह्मास्त्र' बद्दल सांगायचं झालं तर या सिनेमातील विएफएक्स बाकी आहेत आणि अनेक सीन शूट देखील करणं बाकी आहे. त्यामुळे रणबीरचा 'शमशेरा' सिनेमा आधी रिलीज करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असं म्हटलं जातंय की लॉकडाऊननंतर संधी मिळाल्यावर लगेचच 'शमशेरा'चे निर्माते हा सिनेमा रिलीज करु शकतात.  

ranbir kapoor film brahmastra may not release after lockdown but this film to be first release  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranbir kapoor film brahmastra may not release after lockdown but this film to be first release