
Ananya आणि आदित्यच्या प्रेमाला अखेर रणबीर कपूरनं केलं कन्फर्म..म्हणाला..
Ranbir Kapoor: बी-टाऊन मध्ये कोण कोणाला डेट करतय या बातम्यांची नेहमीच चर्चा रंगते. लोक देखील अशा बातम्या मोठ्या इंट्रेस्टनं वाचतात. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये एका नव्या कपलचं नाव समोर येत आहे ते म्हणजे आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे.
बोललं जात होतं की दोघं एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनीही अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण पाहिलं तर बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये दोघं अनेकदा स्पॉट केले गेले. या दोघांनी नसलं तरी आदित्य सोबत 'ये जवानी है दिवानी' मध्ये काम करणाऱ्या रणबीर कपूरनं मात्र यांच्या नात्यावर मोहोर उमटवली आहे.(Ranbir Kapoor On Ananya Panday And Aditya Roy Kapoor Affair)
रणबीर खुलासा करत म्हणाला आहे की, ''मला माहित आहे की आदित्यला एक मुलगी आवडते. तिचं नाव A अक्षरापासून सुरू होतं''. रणबीरचं हे वक्तव्य ऐकून चाहत्यांनी मात्र अनन्या पांडेच्या नावाचा जयघोष सुरू केला आहे.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे एकमेका्ंना डेट करत आहेत याचं कन्फर्मेशन निर्माता करण जोहरनं आपल्या 'कॉफी विथ करण' या चॅट शो मध्ये दिलं होतं. यानंतर क्रिती सनन च्या दिवाळी पार्टीमधला अनन्या-आदित्यचा एक फोटौ व्हायरल झाला होता,ज्यात दोघांमध्ये जवळीक दिसली होती. त्यांना बॉलीवूडच्या पार्टीत देखील एकत्र पाहिलं जातं. पण दोघांनी मात्र यावर मौन साधलं आहे.
अनन्या-आदित्यच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर अनन्या लवकरच आयुष्यमान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल २' मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे आणखी दोन प्रोजेक्ट्स आहेत. त्यातला एक सिनेमा विक्रमादित्य मोटवानीचा आहे तर दुसरा 'Call Me Bae' हा आहे. आदित्यविषयी बोलायचं झालं तर त्याला नुकतच मृणाल ठाकूरसोबत गुमराह या सिनेमात पाहिलं गेलं. सध्या तो 'द नाइट मॅनेजर सीझन २' मध्ये व्यस्त आहे.
तर रणबीर कपूरला 'अॅनिमल' सिनेमात आपण पाहणार आहोत. त्याच्यासोबत या सिनेमात पहिल्यांदाच रश्मिका मंदाना दिसणार आहे. या सिनेमाला संदीप वांगानं दिग्दर्शित केलं आहे. याव्यतिरिक्त रणबीर 'ब्रह्मास्त्र २' मध्ये देखील दिसणार आहे.