
Ranbir Kapoor: 'आलिया लेबर रूममध्ये होती तेव्हा...', रणबीर कपूरनं सांगितला तो अनुभव
रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या रणबीर त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'तू झुठी मैं मक्कार'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत दिसला आहे.
त्याच वेळी, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या 12 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीरने आलियासोबतच्या त्याच्या लेबर रूमच्या अनुभवाबद्दल सांगितले.
रणबीर कपूर त्याची चुलत बहीण करीना कपूरच्या शो 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये पोहोचला होता. यादरम्यान अभिनेत्याने स्वतःला वडील म्हणून रेट केले. रणबीरने त्याच्या लेबर रूमच्या अनुभवाबद्दल देखील सांगितले 'तो अनुभव खूप चांगला होता' असे तो म्हणाला.
यासोबतच राहाच्या जन्मावेळी तो आठवडाभर रुग्णालयातच होता, अशी माहितीही समोर आली आहे. जेव्हा आलियाने आपल्या मुलीला मिठी मारली तेव्हा त्याने त्याला 'जादुई' क्षण म्हटले. स्वत:ला वडील म्हणून रेटिंग देण्याच्या प्रश्नावर रणबीर म्हणाला की, मला स्वत:ला 7 रेटिंग द्यायला आवडेल.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूर लवकरच रश्मिकासोबत अॅनिमलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून तो यावर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणबीरचे अनेक आगामी प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.