
Ranbir Kapoor: 'याला म्हणतात अनुभवाचे बोल', रणबीर कपूरचं 'प्यार होता कई बार है' गाणं चर्चेत..
Ranbir Kapoor movie Tu Jhoothi Main Makkaar: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'तू झुठी में मक्कार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा कपूर दोघे पहिल्यांदाच एकत्रल दिसणार आहे. तू झुठी मैं मक्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. या चित्रपटाचे गाणेही प्रेक्षकांच्या पंसतीस उतरत आहेत.
तेरे प्यार में या गाण्यानंतर त्याचे नुकतेच 'प्यार होता कई बार' हे नवीन गाणं रिलिज झालं आहे. हे गाणं रिलिज होताच नेटकऱ्यांनी रणबीरला टोमणे मारायला सुरवात केली आहे. हे गाणे त्याचा बायोपिक असल्याचे चाहते कमेंट करत आहेत. चाहत्यांच्या या कमेंटवर रणबीरने प्रतिक्रिया दिली आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनच्या संदर्भात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो पोहोचला. यादरम्यान रणबीरने त्याच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. या चित्रपटातील 'प्यार होता कैसे बार' या गाण्याबद्दलही तो बोलला.
त्याने सांगितले की या गाण्यात त्याची बायोपिक नाही. रणबीर म्हणाला, 'मला सांगायचे आहे की हे माझे बायोपिक गाणे नाही. तू झुठी मैं मकर मधील माझी व्यक्तिरेखा कॅसानोवाची नाही. या चित्रपटात मी अशा लोकांना मदत करत आहे ज्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी आलो आहे. हा चित्रपट माझ्या आयुष्यावर आधारित नाही.'
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. तू झुठी मैं मक्कार या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 8 मार्च 2023ला प्रदर्शित होणार आहे.