
Ranbir Kapoor: 'आलिया आणि तुझ्यात कोण आहे अधिक पझेसिव्ह?', रणबीरचं उत्तर ऐकून म्हणाल,'पोरगा सुधारला..'
सध्या रणबीर कपूर भलताच फॉर्मात आहे ते त्याच्या 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाच्या प्रमोशनमुळे. जेव्हा पासून सिनेमा अनाऊन्स झाला तेव्हापासून सुरुवातीला त्याच्या नावामुळे चर्चेत राहिला. तो श्रद्धा कपूरसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
लव रंजननं दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाच्या गाण्यांनी सध्या तरुणाईवर चांगलीच भुरळ घातलेली आहे. सध्या रणबीर शहरा-शहरांत या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं फिरताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये रणबीरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि आलिया भट्टविषयी देखील अनेक प्रश्न विचारले गेले.
एका पत्रकारानं रणबीरला,तुझ्यात आणि आलियात अधिक पझेसिव्ह कोण आहे? असा प्रश्न विचारला तेव्हा रणबीरनं दिलेलं उत्तर ऐकाल तर लग्नानंतर पोरगा सुधारला..नक्कीच म्हणाल.
रणबीर म्हणाला,''पझेसिव्हनेसबद्दल बोलायचं झालं तर मी आमच्या दोघांमध्ये कोण पझेसिव्ह आहे हे सांगण्यापेक्षा मी माझ्या बाबतीत सांगेन. जेव्हा मी यंग होतो तेव्हा मी अधिक पझेसिव्ह होतो. पण आता माझं वय वाढलंय तसा माझ्या विचारातही मोठा बदल झाला आहे''.
'' मी आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट नीट विचार करुन समजून घेण्याचा प्रयत्न करतो..आता दुनियादारी चांगली कळायला लागली आहे. मला वाटतं पझेसिव्हनेस ही खूप स्वार्थी भावना आहे. तुम्हाला जसं स्वतःला सगळ्या बाबतीत सुरक्षित बनवायचं असतं तसंच जगण्याचं स्वातंत्र्य तुम्ही तुमच्या जोडीदाराला द्यायला हवं''.
''मला वाटतं सगळ्यात अधिक महत्त्वाची गोष्ट नात्यात असते ती असते आदर. जर तुम्ही एकमेकांचा आदरच करु शकत नसाल तर त्याला काहीच अर्थ नाही. जर तुम्ही एकमेकांचा आदर करता..एकमेकांना पुरेसा वेळ देता..प्रेम देता तेव्हा या पझेसिव्हनेस सारख्या छोट्या-छोट्या गोष्टी मध्ये येत नाहीत''.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर..सध्या त्याचा 'तू झूठी मै मक्कार' सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमात पहिल्यांदाच त्याच्यासोबत श्रद्धा कपूर काम करते आहे.
या सिनेमानंतर रणबीर कपूर लवकरच 'अॅनिमल' सिनेमात रश्मिका मंदानासोबत काम करताना दिसणार आहे. या सिनेमाचं शूट अंतिम टप्प्यात आहे.
कबीर सिंग फेम दिग्दर्शक संदीप रेड्डीनं 'अॅनिमल' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'अॅनिमल' सिनेमात रणबीर कपूर,रश्मिका मंदानासोबत अनिल कपूर,त्रिप्ती दिमरी आणि इतरही कलाकारांची मोठी टीम आहे.