TJMM Box Office Collection: 'तू झुठी मैं मक्कार' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील, चित्रपटाने 11व्या दिवशी केली इतकी कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and shraddha kapoor

TJMM Box Office Collection: 'तू झुठी मैं मक्कार' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील, चित्रपटाने 11व्या दिवशी केली इतकी कमाई

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा कॉमेडी-रोमँटिक चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने धमाकेदार व्यवसाय केला. दुसरा आठवडा थोडा सुस्त गेला, पण तरीही चित्रपटाने भरपूर कमाई केली. हा चित्रपट आता 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

श्रद्धा आणि रणबीरचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'चा एकूण बिझनेस 100 कोटींच्या पुढे गेला आहे. चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारपेक्षा दुसऱ्या शनिवारी दुप्पट कमाई केली. अहवालानुसार शुक्रवारी चित्रपटाने 3.50 कोटींचा व्यवसाय केला, तर TJMM ने दुसऱ्या शनिवारी 6 कोटी कलेक्शन केले.

गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत चित्रपटाचे शनिवारचे कलेक्शन चांगले होते. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 102.21 कोटींची कमाई केली आहे.

लव रंजन दिग्दर्शित तू झुठी मैं मक्कार हा 100 कोटींचा टप्पा पार करणारा कोविड नंतरचा 7 वा चित्रपट आहे. तसेच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा या वर्षातील दुसरा चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणनंतर या चित्रपटाने धमाल केली. रणबीरने गेल्या वर्षीही 'ब्रह्मास्त्र'ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.

चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर आणि श्रद्धा यांनी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. दोघांच्या केमिस्ट्रीने मोठ्या पडद्यावर खूप धमाल केली आहे. त्याच्याशिवाय अनुभव बस्सीने या चित्रपटातून पदार्पण केले असून त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटात बोनी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.