
रणबीर कपूरचा Tu Jhoothi Main Makkaar पाहण्यासाठी खचाखच भरलं थिएटर! व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
रणबीर कपूर, श्रद्धा कपूर यांची लव्ह स्टोरी असलेला तू झुठी मैं मक्कार हा चित्रपट 8 मार्चला म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरवातीला या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र आता हा चित्रपट फारस प्रेक्षकांच मनोरजंन करण्यात यशस्वी झालेला नाही असं दिसतयं.
दरम्यान या चित्रपटाशी संबधित एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तू झुठी मैं मक्कार या चित्रपटावेळी सिनेमागृह किती खचाखच भरलेली आहेत हे दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच तो सोशल मिडियावर व्हायरल झाला.
तो व्हिडिओ पाहिल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा खुपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याच दिसत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चित्रपटगृहांमध्ये 'तू झुठी में मक्कार' पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे, पण या व्हायरल व्हिडिओमागील सत्य काही वेगळच आहे.
मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्हिडिओचे कमेंट पाहिल्यानंतरच कळते. एका यूजरने लिहिले की, 'बॉलिवुडने प्रमोशनवर जेवढं लक्ष दिलं तेवढच तर दर्जेदार कंटेंटवर केले असतं, तर सोशल मीडियाला खरेदी करण्यासाठी इतके पैसे लागले नसते.' दुसर्याने कमेंट केली, 'खूप वाईट आणि ओव्हर अॅक्टिंग चित्रपट... यात काही शंका नाही की त्यांना संदेश दाखवायचा होता, पण तो बकवास होता.' दुसर्याने लिहिले की, डिझास्टर
तर हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ तमिळनाडूतील राम मुथुरंगम सिनेमा हॉलचा व्हिडिओ असून तो खोटा असल्याचा दावाही काही लोकांनी व्हिडिओबद्दल केला आहे. हा व्हिडीओ एडिट केलेला असल्याचेही अनेकजण म्हणताय.
लव रंजनने यापूर्वी 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारखे चित्रपट केले आहेत. त्याच्या चित्रपटांमध्ये एक वेगळी स्टोरी असते. 'तू झुठी मैं मक्कार' कडून लोकांना अशीच स्टोरी काहीतरी चांगलं पाहायला मिळेल मात्र हा चित्रपट लोकांची मने जिंकण्यात अयशस्वी झाला असल्याच दिसत आहे.