
Ranbir Kapoor: 'जेव्हा तुम्ही वयाच्या चाळीशीत असता तेव्हा..', वैयक्तिक आयुष्याविषयी स्पष्टच बोलला रणबीर
Ranbir Kapoor सध्या त्याच्या आगामी 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलताच बिझी आहे. यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीमधनं तो खूप मॅच्युर्ड गोष्टी बोलताना दिसत आहे. आपण जसे मोठे होतो तसे अधिक भावनिक दृष्ट्या परिपक्व होतो आणि त्याची झलक आपल्या कामातही दिसते असं तो म्हणाला.
तो म्हणाला की, ''गेल्या ३ वर्षात जे उतार-चढाव आपण पाहिले त्यामुळे एक कलाकार म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला थोडा वेळ लागेल''.(Ranbir Kapoor 'tui jhoothi main makkaar' bollywood actor talks about personal life)
रणबीर कपूरचे वडील Rishi Kapoor यांचे कॅन्सरनं एप्रिल,२०२० मध्ये निधन झाले. त्यानं गेल्याच वर्षी आलिया भट्टशी एप्रिल महिन्यात लग्न केलं आणि त्यानंतर नोव्हेंबर मध्ये त्याची मुलगी राहा हिचा जन्म झाला. त्यानं म्हटलं आहे की या सगळ्याच गोष्टींनी त्याला आयुष्याकडे पाहण्याचा एक द़ृष्टिकोन दिला.
रणबीरनं पीटीआय ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला आहे, ''आपल्या आई-वडीलांचं निधन होणं हे कुणाच्याही आयुष्यातील खूप दुःखद घटना असते''.
'' जेव्हा तुम्ही ४० वर्षाचे असता तेव्हा नेहमी असं होतं की..तुम्ही अनेकदा यासाठी तयार नसता. येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यास तुमची पटकन तयारी नसते. तुमचं कुटुंब त्यावेळी तुमची अनेकदा यासाठी मदत करतं.''.
हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
रणबीर पुढे म्हणाला,''जेव्हा वयाच्या चाळीशीत तुम्ही आयुष्याला समजून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा अनेक चांगल्या-वाईट गोष्टी समोर येतात. मी एका मुलीचा पिता आहे, गेल्याच वर्षी माझं लग्न झालं. खूप उतार-चढाव आयु्ष्यात आले. पण हेच तर आयुष्य आहे. भावनिक पातळीवर जे बदल माझ्या आयुष्यात आता झाले आहेत..ती मॅच्युरिटी माझ्या अभिनयात यायला थोडा वेळ लागेल...काही वर्ष लागतील''.
रणबीरचा 'ब्रह्मास्त्र- पार्ट वन शिवा' या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केलेली आपण पाहिली. त्याचा 'शमशेरा' मात्र दणकून आपटला. त्याचा आगामी 'तू झूठी..मै मक्कार' सिनेमा ८ मार्चला रिलीज होत आहे.
यावर अभिनेता म्हणाला,''कोरोनानंतर लोकांचा सिनेमाकडे पहायचा दृष्टिकोन बदलला आहे. लोक अॅक्शन सिनेमे, स्पेशल इफेक्ट सिनेमांना घेऊन खूप उत्सुक आहेत''
रणबीरचा 'तू झठी,मै मक्कार' सिनेमा एक रोमॅंटिक कॉमेडी आहे.