घाम फूटलेला..हात थरथरत होते.., 'या' अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना चक्क घाबरला होता रणबीर..Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor

Ranbir Kapoor: घाम फूटलेला..हात थरथरत होते.., 'या' अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना चक्क घाबरला होता रणबीर..

Ranbir Kapoor: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरनं इंडस्ट्रीमध्ये अनेक सौंदर्यवतींसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स केला आहे. रणबीरविषयी बोललं जातं की तो इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय आहे आणि तो खूप रोमॅंंटिक आहे.

रिल लाइफ ते रिअल लाइफ पर्यंत रणबीरच्या रोमान्सची चर्चा अनेकदा रंगताना दिसली आहे. पण तुम्हाला माहित आहे का रणबीर कपूरला बॉलीवूडच्या एका सौंदर्यवतीसोबत जबरदस्तीनं रोमान्स करावा लागला होता आणि तसं करताना त्याला भीतीनं खूप घाम आला होता,त्याचे हात अक्षरशः थरथरत होते.(Ranbir Kapoor was nervous shooting a romantic scene with this actress)

रणबीर कपूरनं एका मुलाखती दरम्यान सांगितलं की 'ए दिल है मुश्किल' च्या सेटवर जेव्हा त्याचा आणि ऐश्वर्या रायचा रोमॅंटिक सीन शूट होत होता तेव्हा परिस्थिती अवघड होऊन बसली होती. रणबीरचे हात थरथरत होते,तो खूपच नर्व्हस होता. त्याला लाज वाटत होती. ज्यानंतर ऐश्वर्यानं त्याला समजावलं की हा फक्त अभिनय आहे,यात चुकीचं काही नाही.

रणबीर म्हणाला की,''मला वाटलं ऐश्वर्यासोबत काम करण्याची संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही, ही माझी शेवटची संधी असू शकते ..असा विचार मी केला आणि मग पुढचे सगळे सीन मस्त शूट झाले''.

माहितीसाठी सांगतो की रणबीरच्या या मुलाखती नंतर लोक त्याला ट्रोल करु लागले होते. लोकांचे म्हणणे होते की रणबीरनं ऐश्वर्याचा अपमान केला आहे. अशामध्ये रणबीरनं ट्रोलर्सला चांगलाचा पलटवार केला होता.

तो म्हणाला होता की,''मी ऐश्वर्याचा खूप आदर करतो. ती आमची फॅमिली फ्रेंड आहे, मी तिचा अनादर करायचा विचार कधीच करू शकत नाही''.