रणबीर होणार 'डेव्हिल'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

"कबिर सिंग' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा "डेव्हिल' हा हिंदी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी रणबीरची निवड केली आहे.

मुंबई : रणबीर कपूरचा रुपेरी पडद्यावरील रोमॅण्टीक अंदाज पाहता अल्पवधीतच तो लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. आता तो काहीतरी नवा प्रयोग करू इच्छित आहे.

"कबिर सिंग' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा "डेव्हिल' हा हिंदी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी रणबीरची निवड केली असून, त्याच्या वाट्याला नकारात्मक भूमिका आली आहे. तो या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट एक क्राईम ड्रामा असेल. टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. रोमॅण्टीक भूमिकेनंतर रणबीरला व्हिलन बनण्याचे वेध लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranbir Kapoor will play villain in movie Devil