Rang Maza Vegla: हा काय फालतूपणा.. 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या नव्या ट्विस्टवर प्रेक्षक भडकले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rang Maza Vegla serial new twist 14 years leap audience angry reaction trolled

Rang Maza Vegla: हा काय फालतूपणा.. 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या नव्या ट्विस्टवर प्रेक्षक भडकले..

Rang Maza Vegla: लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा'ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेले कित्येक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकत टीआरपी मध्ये पहिला नंबर कायम राखला. पण आता मात्र हे गणित काहीसे बदलले आहे. कारण या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे.

दीपाच्या एका साक्षीने कार्तिकला 14 वर्षांचा तुरुंगवास झाला होता. त्यामुळे आता 14 वर्षांचा लिप या मालिकेत घेतला जाणार आहे. म्हणजेच ही मालिका 14 वर्षे पुढे जाणार आहे. या सगळ्या ट्विस्टवर चाहते मात्र जोरदार टीका करत आहेत.

(Rang Maza Vegla serial new twist 14 years leap audience angry reaction trolled)

दीपा कार्तिकच्या दुसऱ्या लग्नानंतर आता कुठे सगळं काही ठीक होईल अशी प्रेक्षकांना आशा होती. पण मालिकेत ट्विस्ट काही संपत नाहीयेत. दीपा कार्तिकचा सुखी संसार पाहायला मिळणार अशी आशा वाटत असतानाच पुन्हा एक ट्विस्ट आला. ज्यामध्ये दीपाच्या मैत्रीणीचा कार्तिकनेच जीव घेतला असे समोर येते आणि कार्तिकला तुरुंगात जावे लागले. यामध्ये दीपाची साक्ष त्याला तुरुंगात पाठवण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते.

एक प्रोमो समोर आला आहे , ज्यामध्ये कार्तिकला पोलीस घेऊन जात असतात. आता मालिका 14 वर्षे पुढे सरकणार आहे. या प्रोमोवर चाहत्यांनी मात्र सडकून टीका केली आहे. स्टार प्रवाहने पोस्ट केलेल्या या प्रोमो व्हिडीओखली कमेंटचा पाऊस पडला आहे.

'यांचे लग्न झाले तेव्हा वाटले होते कि सर्व चांगलं दाखवतील पण यांची फालतूपणा करायची सवय गेली नाही.. प्रेक्षकांनाच पाठवा आता अज्ञातवासात आणि तुम्हीच बघा तुमची नाटकं ..कधीतरी happy ending दाखवा ..' असे एकाने म्हंटले आहे. तर 'आता कुठे दीपाच्या आयुष्यात चांगलं वळून आलो होतो लगेच तुम्ही त्याच्यामध्ये twist आला काय बघायचं की नाही बघायचं आता आम्ही...' असेही एकाने म्हंटले आहे.

'फालतूपणा चालू आहे नुसता..' 'हा मूर्खपणा आहे..', 'आम्ही आधी खूप बघायचो हि मालिका पण आता बघणार नाही...' अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून आल्या आहेत.

टॅग्स :Marathi Serialstar pravah