‘रंगवैखरी’ नाट्याविष्कार स्पर्धा २२ डिसेंबरपासून

‘रंगवैखरी’ नाट्याविष्कार स्पर्धा २२ डिसेंबरपासून

मुंबई : मराठी भाषेच्या देदीप्यमान साहित्यिक परंपरेला आजच्या युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या ‘रंगवैखरी’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या, यंदाच्या ‘कथारंग’ या पर्वाला महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. आधीच्या दोन पर्वांच्या तुलनेत या पर्वाला अधिक संख्येने प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २२ ते २६ डिसेंबरदरम्यान ही प्राथमिक फेरी पार पडेल.

२२ डिसेंबरला मुंबईच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी; तर २३ डिसेंबरला अमरावतीच्या टाऊन हॉल आणि रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात, २४ डिसेंबरला जळगावच्या मायादेवी नगरातल्या रोटरी भवन हॉल आणि बेळगावच्या लोकमान्य रंगमंदिरात, २५ डिसेंबरला नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारक तसेच कोल्हापूरच्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात; तर २६ डिसेंबरला अहमदनगरच्या माऊली सभागृह आणि पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड इथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ही प्राथमिक फेरी पार पडेल.

रंगवैखरीच्या तिसऱ्या पर्वासाठी ‘कथारंग’ हा विषय देण्यात आला आहे. विविध दिग्गज २५ पैकी एका साहित्यिकाच्या कथेवर वा कथासाहित्यावर आधारित नवीन नाट्यसंहिता विद्यार्थ्यांनी लिहून, दिग्दर्शित करून, तिचे संगीत, नृत्य, चित्र, शिल्प यांसह नाट्याविष्कार सादरीकरण करायचे आहे.

web title : The 'Rangavakhari' theatrical competition from December 22

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com