रंगभुमी दिनाच्या कार्यक्रमांना सांगलीत प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

सांगली - स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या विविध नाट्यपदांनी रंगभूमी दिनाच्या दिवसभराच्या विविध कार्यक्रमांना आज प्रारंभ झाला. सकाळ सत्रात येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात यंदाचे भावे गौरव पदकाचे मानकरी डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते नटराज पूजन झाले. त्यानंतर ही नाट्यगीतांची मैफल झाली. 

मराठी रंगभूमी दिनी नाट्यपंढरी सांगलीत प्रतिवर्षाप्रमाणे सकाळ सत्रात पुरस्कार विजेत्यांच्या हस्ते नटराज पूजन होत असते. यावेळी नाट्यसंमेलनाध्यक्षा किर्तीश शिलेदार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन, नाट्य अभिनेते राजन भिसे, अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे, उपाध्यक्ष विनायक केळकर आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर नाट्यगितांची मैफल झाली. 

स्नेहल पुराणिक , तन्वी केळकर, चिन्मयी गोखले, रोहित गुळवणी, मिताली जोशी, नुपूर देसाई, शर्वरी केळकर, अनुष्का पाटील, मृणाल बर्वे, सरिता मद्रासी,केतकी परांजपे, आर्या खाडीलकर, कोमल कुलकर्णी यांनी नाट्यपदे गायली,रसिकांचा प्रतिसाद मिळाला. 

अखिल भारतीय नाट्य चित्रपट कलावंत कर्मचारी मंडळाच्यावतीनेही दैवज्ञ भवनात रंगभूमी दिन साजरा झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rangbhumi Day Program starts in Sangli