राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत कंगना 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

बॉलीवूडची "क्वीन' अभिनेत्री कंगना राणावतचा अलीकडेच प्रदर्शित झालेला "रंगून' चित्रपट प्रेक्षकांच्या फारशा पसंतीस उतरला नाही. तिच्या फॅन्सचाही त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. साहजिकच कंगना निराश झाली. तसे तिने जाहीरपणे कबूलही केले. आता झाले-गेले विसरून ती पुन्हा जोमाने कामाला लागलीय. "लाईफ स्टाईल'च्या एका कार्यक्रमात ती नुकतीच सहभागी झाली होती. "मी आता एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्‍टवर काम करतेय. चित्रपटाचे नाव आहे "मणिकर्निका- द क्वीन ऑफ झांशी.' चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे, असे तिने तेव्हा जाहीर केले. 

"मणिकर्निका...'मध्ये कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच ती आपल्या रोलसाठी प्रचंड मेहनत घेतेय. त्यासाठी ती घोडेस्वारी शिकतेय. दृश्‍य पडद्यावर जिवंत दिसण्यासाठी ती जी तोड मेहनत घेतेय. चित्रीकरणापूर्वी ती रिहर्सलसाठी वर्कशॉप अटेंड करणार आहे. आणखी एक चॅलेंजिंग रोल मिळाल्याने कंगना फारच उत्सुक आहे. "प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर काम करायचेय. एका मुलाला पाठीवर बांधून घोडेस्वारी कशी केली जाते आणि तोंडात लगाम पकडून दोन तलवारीने कसे लढले जाते, हे सर्व शिकायचेय. पडद्यावर सर्व काही जिवंत वाटले पाहिजे... असे कंगना सांगते तेव्हा तिची कामाबद्दलची आपुलकी प्रकर्षाने जाणवते.  

Web Title: Rani Lakshmi Bai - Kangana Ranaut Instense Training Session