राणीने शेअर केले आपल्या लेकीचे पत्र

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

बॉलिवूडमध्ये काही मंडळी रोजच नवे-नवे ट्रेन्ड आणत आहेत. यातला एक "विन्टेज ट्रेंड' म्हणजे पत्रलेखनाचा. मध्यंतरी बिग-बीनी आपल्या सर्व नातवंडांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले. आता "कुछ-कुछ होता है' चित्रपटात राणी आपल्या लाडक्‍या अंजलीसाठी पत्रे लिहून ठेवते, तसे तिने आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातदेखील पहिल्याच वाढदिवसाला लिहलेले पत्र लेकीच्या फोटोसहित शेअर केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी बराच काळ प्रसारमाध्यमे आणि छायाचित्रकारांपासून लांब होती. सध्या परत एकदा राणी चर्चेत आली आहे,ती म्हणजे लेक अदिराच्या फोटोमुळे. राणीने या पत्रात स्वत:चा "आई' होण्याचा प्रवास लिहिला आहे. या वर्णातून तिचा मोठा आनंद दिसतो.

राणी मुखर्जी-आदित्य चोप्राच्या यांच्या संसारात 2015मध्ये आदिराचे आगमन झाले. लग्नाच्या आधीपासून ते अगदी आत्तापर्यंत अदिराला आणि स्वत:ला छायाचित्रकार आणि प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवले. राणीने लिहिलेल्या या पत्रात,""मी आता खूप शांत, सहनशील आणि समजूतदार झाली आहे. माझ्यातील हा बदल चांगलाच जाणवतो. हा बदल एका कारणासाठीच असावा असं मला वाटतं. मी अशी आशा करते की आदिरालासुद्धा मी चांगल्या पध्दतीने, संस्कारक्षम करेन. सर्वांना तिचा गर्व वाटावा असंच मला वाटते.माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय काहीही करू शकत नाही'' असे राणीने या पत्रात लिहिले आहे.
बॉलिवूडमधल्या काही मोजक्‍याच अभिनेत्रींना आपले खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल साधल्याचे दिसते,राणी त्यापैकीच एक आहे. राणीने लग्नानंतरही तिचे चित्रपटसृष्टीतील कार्य सुरु ठेवले असून तिची आता "परफेक्‍ट मॉम'होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते.

Web Title: Rani Mukerji Shares A Picture Of Daughter Adira On Her First Birthday