'या' अभिनेत्रीने नाकारलेल्या भूमिकेमुळे राणी रातोरात बनली बॉलीवूडची स्टार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

वडिलांचा बंगाली सिनेमा बियर फूल पासून राणीने तिच्या करिअरची सुरुवात केली होती..यानंतर हाच सिनेमा हिंदीमध्ये राजा की आऐगी बारात या नावाने बनवला..असं म्हणतात की राणीने तिच्या आईच्या सांगण्यावरुन बियर फूल सिनेमात काम केलं होतं

मुंबई- अभिनेत्री राणी मुखर्जीने राजा की आऐगी बारात या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं..सिनेमा तर प्रेक्षकांना पसंत नाही पडला पण ती बॉलीवूडची राणी बनली..प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या राणी मुखर्जीचा आज ४२ वा वाढदिवस..२१ मार्च १९७८ मध्ये राणीचा जन्म झाला..राणीचं पूर्ण कुटूंब बॉलीवूडशी निगडीत होतं..तिचे वडिल राम मुखर्जी यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं.

Image result for rani mukharjee in her childhood

वडिलांचा बंगाली सिनेमा बियर फूल पासून राणीने तिच्या करिअरची सुरुवात केली होती..यानंतर हाच सिनेमा हिंदीमध्ये राजा की आऐगी बारात या नावाने बनवला..असं म्हणतात की राणीने तिच्या आईच्या सांगण्यावरुन बियर फूल सिनेमात काम केलं होतं त्यानंतर मग राणीने मागे वळून पाहिलंच नाही..एकानंतर एक सिनेमे ती करत राहिली.

हे ही वाचा : सेलिब्रिटींकडून अशी केली जातेय कोरोनाबाबत जागृती

१९९८मध्ये राणी मुखर्जी विक्रम भट्ट यांच्या गुलाम या सिनेमात आमीर खानसोबत झळकली..आणि हे तिचं पहिलं व्यावसायिक यश होतं..या सिनेमात तिची भूमिका लहान असली तरी  आती क्या खंडाला या गाण्यामुळे ती घराघरात पोहोचली...त्यानंतर दिग्दर्शक करण जोहरने राणीला शाहरुख आणि काजोल यांच्यासोबत कुछ कुछ होता है या सिनेमात कास्ट केलं..आणि हा सिनेमा राणीच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला..राणीने या सिनेमात टीना मल्होत्राची भूमिका साकारली होती..टीनाच्या भूमिकेसाठी राणीच्या आधी ट्विंकल खन्नाला विचारण्यात आलं होतं मात्र तीने काही कारणामुळे याला नकार दिला..आणि राणीने या भूमिकेचं सोनं करुन ती रातोरात स्टार बनली...कुछ कुछ होता है हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर हिट ठरला..तिच्या भूमिकेचं देखील कौतुक झालं..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Pre birthday celebrations #happybirthday #ranimukerji #dubai

A post shared by Rani Mukerji Chopra (@ranimukerji_official) on

राणीचे २००१मध्ये तीन सिनेमे प्रदर्शित झाले..यात चोरी चोरी चुपके चुपके, नायक, बस इतना सा ख्वाब है या सिनेमांचा समावेश आहे..हे तीनही सिनेमे बॉक्स ऑफीसवर फारशी कमाल करु शकले नाहीत..मग त्यानंतर २००२ मध्ये शायद अली यांनी राणीला घेऊन साथिया हा सिनेमा बनवला आणि या सिनेमाने पुन्हा एकदा राणीचं करिअरवर उंचावलं,,साथिया सिनेमाासाठी राणीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला..

राणीच्या करिअरमधील कुछ कुछ होता है, युवा, नो वन किल जसिका,या सिनेमांतील भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे..तसंच हम तुम आणि ब्लॅक सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे..

Image result for rani aaditya daughter'

राणीने २१ एप्रिल २०१४मध्ये सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक आदीत्य चोप्रासोबत पॅरिसमध्ये लग्न केलं.. केवळ कुटूंबासमवेत हा विवाहसोहळा पार पडला..दोघांना ९ डिसेंबर २०१५ मध्ये मुलगी झाली..तिचं नाव त्यांनी दोघांच्या नावातील साम्य शोधत अदिरा ठेवलं..आदीत्य चोप्रा नेहमीच लाईमलाईटपासून दूर असतो..आणि राणीनेही हे मान्य केलंय की आदित्यला फोटो काढलेलं अजिबात आवडत नाही..

Image result for rani mukerji bunty aur babli 2

हिचकी, मर्दानी आणि मर्दानी २ नंतर आता राणी लवकरंच बन्टी और बबलीच्या सिक्वेलमध्ये सैफ अली खान आणि सिद्धार्थ चतुर्वेदीसोबत बबलीची भूमिका साकारणार आहे.. 

on rani mukharjees 42nd birthday know her turning point of career


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on rani mukharjees 42nd birthday know her turning point of career