रणवीर अर्जुनची हाफ गर्लफ्रेंड! 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

बॉलिवूडमध्ये कोणी एकमेकांचे अगदी जीवलग मित्र असणे फारच दुर्मिळ; पण अर्जुन आणि रणवीरविषयी असं म्हणता येणार नाही. अर्जुन कपूरचा "हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

आतापर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून "हाफ गर्लफ्रेंड'चा अर्थ तुम्हाला कळलाच असेल. तसंच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग या दोघांचा याराना सगळ्यांना माहितीच आहे. तुमच्या आयुष्यात असा मित्र नेहमीच असतो, जो तुम्हाला तुमच्या प्राणापेक्षा जास्त प्रिय असतो. अर्जुन आणि रणवीरचंही तसंच आहे. अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर आणि रणवीर सिंग यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.

ज्यामध्ये रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांनी श्रद्धाची खिल्ली उडवलीय. या व्हिडीओमध्ये अर्जुन म्हणतो, "को-स्टारपेक्षा थोडासा जास्त आणि लव्हरपेक्षा थोडा कमी. त्यावेळी कॅमेरा आधी श्रद्धाकडे वळतो मग तो रणवीर सिंगकडे वळतो. त्यानंतर पुन्हा अर्जुन म्हणतो "मी तुझ्याबद्दल नाही याच्याबद्दल बोलतो आहे.' त्यानंतर रणवीर म्हणतो, "मी आहे अर्जुनची हाफ गर्लफ्रेंड.' आणि दोघे मिठी मारून नाचू लागतात. असा हा हसवणारा व्हिडिओ यांनी शेअर केला आहे. या दोघांचा दोस्ताना असाच टिकून राहो याच त्यांना आपण शुभेच्छा देऊया! 

Web Title: Ranveer Arjun Half Girlfriend!