लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी रणवीरने केली खास तयारी, पाहा फोटो !

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार असून त्यांनी या स्पेशल अॅनिव्हर्सरीचा प्लानही केला आहे. जाणून घ्या हे कपल नक्की कशाप्रकारे तयारी करत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची !

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कपल्स आहेत ज्यांची पसंती एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त आहे. अनुष्का आणि विराट, दीपिका आणि रणवीर, प्रियांका आणि निक आणि मलायका आणि अर्जुन. त्यामध्ये दीपिका आणि रणवीर या कपलची पसंती सर्वाधिक पाहायला मिळते. हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनलेला असतात. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार असून त्यांनी या स्पेशल अॅनिव्हर्सरीचा प्लानही केला आहे. जाणून घ्या हे कपल नक्की कशाप्रकारे तयारी करत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची !

Image may contain: 1 person, smiling, close-up

जितकी उत्सुकता दीपिका आणि रणवीरला आहे तितकीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. त्यामुळे अॅनिव्हर्सरीचा प्लान नक्की काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. दरम्यान त्यांचा स्पेशल प्लान लिक झाला असल्याची चर्चाही सुरु आहेत. लग्नाच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीसाठी दीप-वीरने आखलेल्या प्लाननुसार, पहिल्य़ांदा हे कपल बालाजीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पद्मावती मंदिरातही दर्शन घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत परिवारही असणार आहे. बालाजी मंदिराच्या जवळच पद्मावतीचं मंदिर आहे. विशेष म्हणजे हे जोडपं पुढील दर्शनासाठी खास अमृतसरमधील सुर्वणमंदीरालाभेट देणार आहेत. देवदर्शनापलिकडे त्यांचा आणखी कोणता प्लान आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

Image may contain: 1 person, text

शिवाय रणवीर अॅनिव्हर्सरीसाठी खास तयारी करताना दिसतोय. दीपिकाने नुकत्याच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रणवीरचा पार्लरमधील फोटो स्टोरीमध्ये अपलोड केला आहे. यामध्ये रणवीर चेहऱ्यावर फेसमास्क लावून दिसतो आहे. तर, दीपिकाने 'अॅनिव्हर्सरीसाठीची तयारी' असं कॅप्शन दिलं आहे. 

Image may contain: 2 people, beard

दीपिका आणि रणवीर बरेच वर्ष डेट करत होतो मात्र कधीच त्यांनी अधिकृतपणे त्याचा खुलासा केला नाही. अखेर ते मागील वर्षी लग्नहबंधनात अडकले. या कपलची चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता आह. ऑनस्क्रीन आणि खऱ्या आयुष्यातही हे जोडपं तितकचं रोमॅन्टिक आहे. या दोघांनी एकत्र फोटो अपलोड केला की तो सोशल मीडियावर व्हायरल होतोच. 

Image may contain: 2 people, people standing

दीपिका सध्या मेघना गुलजारच्या 'छपाक' या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांना भेटणार आहे. अॅसिडस हल्ला पीडिता लक्ष्मी अगरवाल हिच्या भूमिकेत दीपिका दिसणार आहे. त्याचा पोस्टरही तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. रणवीर आणि दीपिका यांनी संजय लीला भव्साळी यांच्या रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या तीन चित्रपटांमधून एकत्र काम केले. लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी 83 या चित्रपटामधून एकत्र दिसणार आहे.हा सिनेमा 1983 मध्ये भारतीय क्रिकेट टीमनं मिळवलेल्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoor

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer is preparing for first marriage anniversary see photo